🔰मतदार ओळखपत्रास आधार कार्डशी जोडणी करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या संदर्भातील निवडणूक आयोगाच्या प्रस्तावास कायदा मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली आहे.
🔰यासाठी आता सरकारकडून निवडणूक आयोगास कायदेशीर अधिकार मिळणार आहेत. मतदार ओळखपत्र आणि आधार कार्डशी जोडणी केल्यानंतर बोगस मतदारांना रोखता येणार आहे. याचबरोबर प्रवाशी मतदारांना रिमोट वोटिंगचा अधिकार देणेही सोपे होणार आहे.
🔰बोगस मतदानाला आळा घालून ‘एक व्यक्ती एक मत’ योग्यरित्या राबवायचे असेल तर मतदार कार्ड आधारला जोडणे आवश्यक असल्याची मागणी आयोगाकडून अनेक वर्षांपासून केली जात होती.
🔰पेड न्यूज व चुकीच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रासह निवडणूक सुधारणा या सारख्या मुद्यांवरही आयोगाची कायदा मंत्रालयाबरोबर बैठक झाली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा व सुशील चंद्रा यांनी कायदा मंत्रालयाचे सचिव जी नारायण राजू यांच्या ही बैठक पार पडली.
No comments:
Post a Comment