Saturday, 29 February 2020

मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर

- डाॅ. कानिटकर यांना लेफ्टनंट जनरल पदावर बढती देण्यात आली. कानिटकर यांची लेफ्टनंट जनरलपदी निवड गेल्या वर्षीच झाली होती, पण जागा रिक्त झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पदभार स्वीकारला.
- या उच्च पदावर पोहोचलेल्या त्या पहिल्याच मराठी महिला अधिकारी आहेत.
- नवी दिल्ली येथे त्यांनी एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस- वैद्यकीय) म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. हा विभाग संरक्षण प्रमुख यंत्रणेच्या अंतर्गत आहे.
- लष्करात या श्रेणीचे पद मिळवणाऱ्या कानिटकर या तिसऱ्या महिला अधिकारी असून त्या बालरोगतज्ज्ञ आहेत. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- कानिटकर यांचे पती राजीव लष्करात लेफ्टनंट कर्नल होते. ते नुकतेच निवृत्त झाले. पती-पत्नीने लष्करात लेफ्टनंट कर्नलपद भूषवल्याची ही पहिलीच घटना आहे.

● डाॅ. माधुरी कानिटकर
- डॉ. कानिटकर यांनी लष्करात ३७ वर्षे सेवा केली आहे. सीडीएस-वैद्यकीय पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- भारतीय लष्कराच्या तिन्ही सेवांबाबत (हवाई दल, नौदल आणि स्थलसेना) केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम त्या करतील.
- डाॅ. कानिटकर पुण्याच्या आर्म्ड  फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी असून त्यांना राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले होते. त्यांनी बालरोग विषयात पदव्युत्तर पदवी घेतली.
- अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रातून बालकांच्या मूत्रपिंड विकारांवर उपचाराचे प्रशिक्षण घेतले आहे.
- त्या पंतप्रधानांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार मंडळाच्या सदस्या आहेत.
- त्या लष्करी दलातील पहिल्या प्रशिक्षित बाल मूत्रपिंडविकार तज्ज्ञ आहेत.
- पुणे आणि दिल्लीत त्यांनी मुलांच्या मूत्रपिंड विकारावर उपचारासाठी केंद्रे स्थापन केली आहेत.
- २०१७ मध्ये त्या पुण्याच्या आम्र्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या पहिल्या अधिष्ठाता होत्या. तेथे दोन वर्षे काम केल्यानंतर त्यांनी उधमपूर येथे मेजर जनरल (वैद्यकीय) पदाची जबाबदारी स्वीकारली.

● लष्करातील महिलांसाठी २०२० हे संस्मरणीय वर्ष ठरले असून याच वर्षी लष्करी दिन आणि प्रजासत्ताक दिन संचलनाचे नेतृत्व प्रथमच तानिया शेरगील या महिला लष्करी अधिकाऱ्याने केले होते.

● त्रितारांकित अधिकाऱ्यांचे पद नौदलात व्हाइस अ‍ॅडमिरल, स्थलसेनेत लेफ्टनंट जनरल तर हवाई दलात एअर मार्शल या नावाने ओळखले जाते. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. लेफ्टनंट जनरलपद भूषवण्याचा पहिला मान पुनिता अरोरा यांना आहे. त्यानंतर पद्मावती बंडोपाध्याय या पहिल्या महिला एअर मार्शल ठरल्या, तर आता माधुरी कानिटकर या लेफ्टनंट जनरल झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...