Wednesday, 26 February 2020

जगातील सर्वाधिक लांबीचा काचेचा स्कायवॉक अमरावतीत, नवनीत राणांकडून पाहणी

​​

विदर्भाचं काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावतीच्या चिखलदरा येथे लवकरच जगातील सर्वाधिक लांबीचा काचेचा स्कायवॉक उभारला जाणार आहे.

चिखलदरा पर्यटन विकासाच्या आराखड्यात या स्कायवॉकचा समावेश करण्यात आला आहे.

अमरावतीमध्ये चिखलदरा येथे स्कायवॉकची सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे.

या स्कायवॉकची लांबी 500 मीटर इतकी असणार आहे. आतापर्यंत त्याचे 35 टक्के काम पूर्ण झाले आहे.

या स्कायवॉकसाठीचे एकूण बजेट 34 कोटी रुपये आहेत. या स्कायवॉकचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे.

चिखलदऱ्यात होणारा हा पूल भारतातील पहिला काचेचा स्कायवॉक असणार आहे. चिखलदरातील गोराघाट पॉईंटपासून ते हरीकेन पॉंईंटपर्यंत हा स्कायवॉक असेल.

जगात
▪️स्वित्झर्लंड आणि
▪️चायना या ठिकाणी स्कायवॉक आहे.

स्वित्झर्लंडचा स्कायवॉक हा 397 मीटरचा आहे. तर

चीनमधील स्कायवॉक 360 मीटरचा आहे.

त्यामुळे चिखलदरा येथे होत असलेला स्कायवॉक हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्कायवॉक असणार आहे.

चिखलदरा येथे होणारा हा स्कायवॉक 500 मीटर असेल.

त्यासाठी 34 कोटी रुपये लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...