Tuesday, 25 February 2020

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उद्घाटनासाठी सज्ज

📌देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून नावारूपाला येत असलेले सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियम उद्घाटनासाठी सज्ज होत आहे.

📌याच महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याच हस्ते या स्टेडियमचे उद्घाटन व्हावे, यासाठी गुजरात सरकार कामाला लागले आहे.

📌या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता एक लाख दहा हजार इतकी आहे.

📌या स्टेडियमच्या उद्घाटनासाठी ट्रम्प हे अहमदाबाद येथून सरळ हेलिकॉप्टरने स्टेडियमवर येतील.

📌उद्घाटनासाठी येणाऱ्या लोकांसाठी २ किमीच्या आत १७ पार्किंग प्लॉट तयार करण्यात आले आहेत.या प्लॉटमध्ये एक हजार बसेस आणि १० हजार चारचाकी उभ्या राहतील. व्हीव्हीआयपींसाठी विशेष ४ पार्किंग प्लॉट असतील. ही सर्व कामे जोरात सुरू आहेत.

🔴प्रचंड सुरक्षा

📌२४-२५ फेब्रुवारी रोजी या स्टेडियमचे उद्घाटन होईल, अशी आशा केली जात आहे.

📌या कार्यक्रमासाठी अहमदाबाद महानगरपालिकेला खास जबाबदारी देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...