पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि श्रीलंका दरम्यान आंतरराष्ट्रीय क्षेत्रात उड्डाण करण्यासाठी अलायन्स एअर कंपनीला पूर्वप्रभावाने मंजुरी दिली आहे. अलायन्स एअर ही एअर इंडियाची 100% सहाय्यक कंपनी आहे. अंतरिम कालावधीसाठी विशेष परवानगी देण्यात आली असून देशांतर्गत परिचालनासाठी अलायन्स एअरच्या ताफ्यात किमान 20 विमाने किंवा एकूण क्षमतेच्या 20% विमाने, यापैकी जे अधिक असेल ते होईपर्यंत ही व्यवस्था करण्यात आली आहे.
भारताचे श्रीलंकेबरोबर अतिशय जवळचे द्विपक्षीय संबंध असून दोन्ही देशांदरम्यान संपर्क वाढवण्यासाठी तसेच दोन्ही देशातील जनतेमध्ये संवाद वाढवण्याच्या दृष्टीने संपर्क विस्तार करणे हा यामागचा उद्देश आहे. या मंजुरीपूर्वी पालाली आणि बट्टीकलोवा विमानतळावरून कुठल्याही प्रकारची व्यावसायिक उड्डाणे होत नव्हती.
No comments:
Post a Comment