Sunday, 9 February 2020

खुशखबर; लवकरच मोठी भरती

💁‍♂ लोकसेवा आयोगाने यावर्षी पोलिस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी, टंकलेखक, राज्य उत्पादन शुल्क या विभागांमधील पदांच्या भरतीचे नियोजन केले आहे.

👉 पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा कधी होतील, जाहिरात कधीपर्यंत प्रसिध्द होईल याचेही नियोजन करुन अर्थ विभागाला सादर केले आहे. राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 5 एप्रिलला तर मुख्य परीक्षा 2, 3, 4 ऑगस्ट 2020 मध्ये घेतली जाणार आहे.

🧐 *परीक्षेचे नियोजन :*

▪ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्यायदांडाधिकारी प्रथम वर्गची पूर्वपरीक्षा 1 मार्चला तर मुख्य परीक्षा 14 जूनला घेण्याचे नियोजन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केले आहे.

▪ राज्य परिवहन विभागात मोठ्या प्रमाणावर सहायक मोटार वाहन निरीक्षकांची पदे रिक्‍त असून या पदांची भरतीही केली जाणार आहे. 15 मार्चला या पदांसाठी पूर्वपरीक्षा होणार असून 12 जुलैला मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे.

▪ महाराष्ट्र दुय्यमसेवा संयुक्‍त पूर्वपरीक्षा 3 मे रोजी होणार असून मुख्य परीक्षा घेण्याचेही नियोजन ठरले आहे. या विभागाकडून आयोगाला मागणीपत्र प्राप्त झाले असून या पदांच्या भरतीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

▪ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2020, पेपर क्रमांक दोन (लिपीक- टंकलेखक), दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा पेपर क्र. दोन, कर सहायक मुख्य परीक्षा पेपर क्र. दोन आणि महाराष्ट कृषी सेवा परीक्षांचे नियोजन ठप्प आहे.

▪ अभियांत्रिकी सेवा संयुक्‍त पूर्वपरीक्षा 17 मे रोजी घेण्याचे नियोजन आहे, परंतु, मुख्य परीक्षेचे नियोजन ठरलेले नाही.

📍 दरम्यान, वनसेवा परीक्षेचे नियोजन करुनही मागणीपत्र नसल्याने ही प्रक्रिया थांबली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...