Tuesday, 4 February 2020

टोळधाडीमुळे पाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

🌻पिकांवर आलेल्या टोळधाडीमुळे पाकिस्तान देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. या काळात शेत आणि शेतकर्‍यांचे संरक्षण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असणार आहे.

🌻टोळधाडीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांनी 31 जानेवारी 2020 रोजी  मंत्रिमंडळाचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत चार राज्यांसाठी 7.3 अब्ज रुपयांच्या ‘राष्ट्रीय कृती कार्यक्रम’ला मंजुरी देण्यात आली.

🎄ठळक बाबी...

🌻पाकिस्तानातल्या सिंध प्रांतानंतर पंजाब प्रांतात सुद्धा टोळ पिके नष्ट करीत आहेत.सिंध आणि पंजाबवर हल्ला केल्यानंतर प्रथमच टोळ भारतीय सीमेजवळील खैबर पख्तूनख्वामध्ये दाखल झाले आहेत. टोळ सिंध आणि बलुचिस्तानमधून चोलिस्तान आणि नारा येथे दाखल झाले होते.

🌻हवामानातले बदल हे एक कारण आहे ज्यामुळे अधिक काळापर्यंत टोळ जीवंत आहेत. 1993 साली पाकिस्तानला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता त्यापेक्षा आजची परिस्थिती बिकट आहे.

🎄पाकिस्तान देश...

🌻दक्षिण आशियातला हा एक सार्वभौम इस्लामी प्रजासत्ताक देश आहे. भारताची फाळणी होऊन 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान हे राष्ट्र अस्तित्वात आले. पूर्व पाकिस्तान हा प्रांत पुढे 1971 साली बांगलादेश या नावाने स्वतंत्र देश झाला. इस्लामाबाद ही देशाची राजधानी आहे आणि पाकिस्तानी रुपया राष्ट्रीय चलन आहे.

🌻पाकिस्तानची (ब्रिटिश भारताची वायव्य सीमा) अफगाणिस्तानबरोबरची सीमा “ड्युरँड रेषा” म्हणून ओळखली जाते व ती 1893 साली सर मॉर्टिमर ड्युरँड यांनी निश्चित केली आहे तर पाकिस्तानची भारताबरोबरची वर्तमानची सीमा 1947 साली ‘रॅडक्लिफ अवॉर्ड’ या सर सिरिल रॅडक्लिफ यांच्या निवाड्याप्रमाणे निश्चित केली आहे.

🌻सॉल्ट रेंज किंवा सैंधव-मीठदगड-डोंगररांग हे एक भूवैज्ञानिक वैशिष्ट्य आहे. ही डोंगररांग झेलमच्या उत्तरेस जोगीतिला व बाक्राला येथून सुरू होऊन नैर्ऋत्य दिशेने जाते आणि कालाबागजवळ सिंधू नदी ओलांडते आणि सिंधूच्या पश्चिमेस बन्नू व डेरा इस्माइलखान या जिल्ह्यांत पसरते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...