Sunday, 2 February 2020

कोलकात्यात हुगळी नदीखाली  ‘पाण्याखालून धावणारी देशातली पहिली मेट्रो’

पाण्याखालून धावणारी देशातल्या पहिल्या मेट्रो सेवेचे बांधकाम आता शेवटच्या टप्प्यावर आले आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये हुगळी नदीखालून ही मेट्रो धावणार आहे.

देशातली पहिली पाण्याखालून धावणारी रेलगाडी ‘सॉल्टलेक सेक्‍टर-5 आणि हावडा मैदान’ यादरम्यान धावणार आहे. तसेच हा रेल्वेमार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येत आहे. त्यातला पहिला टप्पा 2022 सालापर्यंत प्रवाशांसाठी खुला केला जाण्याची अपेक्षा आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

🔸या रेलगाडीला जलप्रवाहापासून वाचवण्यासाठी एक भक्कम बोगदा तयार करून उच्चस्तरीय सुरक्षा कवच देण्यात आले आहे.

🔸नदीच्या मधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब असून ती नदीच्या तळापासून 30 मीटरच्या खोलीवर आहे. नदीखालून रेलगाडीला हे अंतर पार करण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ लागणार आहे.

🔸या प्रकल्पासाठी हावडा ते कोलकाता दरम्यानच्या मेट्रो मार्गाला जोडणाऱ्या हुगळी नदीखाली दुहेरी बोगद्याचे बांधकाम केले गेले. देशातला हा पहिलाच नदीखालचा बोगदा ठरला.

🔸कोलकातामधील रेल्वेच्या 16.6 किमी लांबीच्या पूर्व-पश्चिम मेट्रो प्रकल्पाच्या अंतर्गत 520 मीटर लांबीचा हा बोगदा तयार करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...