Saturday, 15 February 2020

भारत-अमेरिका व्यापार कराराचे ट्रम्प यांचे संकेत.

♾वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४ व २५ फेब्रुवारीला भारतात येत असून त्यांनी या दौऱ्याबाबत आशावादी असल्याचे सांगून दोन्ही देशात व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येतील असे सूचित केले आहे.

♾पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणानुसार ट्रम्प हे भारत दौऱ्यावर येत असून ते गुजरातमधील अहमदाबाद येथे थांबणार आहेत. मोदी व ट्रम्प यांची संयुक्त सभा (मेळावा)  तेथील स्टेडियमवर होणार आहे.

♾ट्रम्प यांनी ओव्हल कार्यालयात वार्ताहरांना सांगितले की,‘ मोदी हे सभ्यगृहस्थ आहेत, भारत दौऱ्याकडे आपण आशावादी दृष्टिकोनातून पाहात आहोत.

♾ महिनाअखेरीस हा दौरा होणार आहे.’ व्हाइट हाऊ सने त्यांच्या दौऱ्याच्या तारखा जाहीर केल्यानंतर ते बोलत होते.

♾एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ‘दोन्ही देशात व्यापार करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तो व्यापार करार योग्य असेल तरच मान्य केला जाईल.

♾भारत काहीतरी करू इच्छित आहे, त्याच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत जर योग्य असा व्यापार करार होणार असेल तर त्यावर स्वाक्षऱ्या केल्या जातील.’

♾अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजित सिंग संधू यांनी सांगितले की, ‘ट्रम्प व मोदी यांच्यात व्यक्तिगत संपर्क चांगला आहे. त्यातूनच ट्रम्प यांची भारतभेट घडून येत आहे. अमेरिकेला भारताबरोबरचे संबंध एका नव्या उंचीवर नेण्याची इच्छा आहे हे यातून सूचित होते आहे.’

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...