Thursday, 6 February 2020

तानाजी मालुसरे यांच्याविषयी जाणून घ्या 'या' गोष्टी

छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात खास व्यक्ती तानाजी मालुसरे यांची आज (4 फेब्रुवारी) पुण्यतिथी.

कोंढाणा किल्ला जिंकण्याच्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ...

एकदा कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिली, तेव्हा तानाजी स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत असताना तानाजी ही तयारी अर्धवट सोडून महाराजांसमक्ष प्रस्तुत झाले.

कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिल्यानंतर तानाजींनी कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला.

ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. आधी 'लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे'. हे त्यांचे शब्द इतिहासात प्रसिद्ध पावले.

तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोहचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी द्रोणगिरीचा कडा निवडला.

रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता त्यांनी किल्ला पार केला.

अचानक हल्ला करून त्यांनी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले.

शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागून 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलार मामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला.

गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना 4 फेब्रुवारी, 1670 रोजी घडली.

तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसर्‍या दिवशी छत्रपती शिवाजीराजे सिंहगडावर पोहचले तेव्हा त्यांना समजले.

त्यावेळी महाराज म्हणाले "गड आला पण सिह गेला". अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या उमरठे या गावी पाठवले. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'वीरगळ' स्थापन करुन एक सुंदर स्मारक उभे केले गेले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...