Thursday, 11 April 2024

महात्मा जोतिबा फुले

�दि. ११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती�


��या महामानवाचा जीवनपट��


इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा

इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.

इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.

इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.

इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.

इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.

इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.

इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.

सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.

इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.

मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.

नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.

इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.

इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी

इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.

इ.स. १८५६ - जोतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.

इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.

इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.

इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .

इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.

इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.

इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).

इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.

इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.

इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.

इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.

इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.

इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.

इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.

इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.

२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.

No comments:

Post a Comment