Sunday, 16 February 2020

भूगोल प्रश्नसंच

1) जोडया जुळवा.
   अ) सिंधुदुर्ग    1) पेट्रोलियन/ खनिज तेल
   ब) मुंबई    2) औषधी खनिजयुक्त पाणी
   क) गडचिरोली    3) मँगनीज
   ड) ठाणे    4) चुनखडी
   1) अ-4, ब-2, क-1, ड-3      2) अ-3, ब-1, क-4, ड-2
   3) अ-3, ब-2, क-4, ड-1      4) अ-2, ब-1, क-3, ड-4
उत्तर :- 2

2) लोह व ॲल्युमिनिअमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते ?
   1) काळी मृदा    2) गाळाची मृदा    3) जांभी मृदा    4) पिवळसर मृदा
उत्तर :- 3

3) खालीलपैकी कोणती जोडी कृषी विद्यापीठ व गाव यांच्या करिता बरोबर आहे ?
   1) मराठवाडा कृषी विद्यापीठ – राहुरी
   2) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ – अकोला
   3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी विद्यापीठ – परभणी
   4) महात्मा फुले कृषी विद्यापीठ – दापोली
उत्तर :- 2

4) मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर .......................... हे आहे.
   1) कांडला    2) मार्मागोवा    3) हल्दीया    4) न्हावा-शेवा
उत्तर :- 4

5) पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या 2009 च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर
     कोणते ?     
   1) मुंबई    2) ठाणे      3) चंद्रपूर      4) नागपूर
उत्तर :- 3

1) महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने ........................... जिल्ह्यात आढळतात.
   1) सोलापूर    2) अहमदनगर   
   3) जालना    4) अमरावती
उत्तर :- 2

2) माथेरान हे ........................ वस्तीचे उदाहरण आहे.
   1) रेषीय    2) जुळी     
   3) गोलाकार    4) डोंगरमाथा
उत्तर :- 4

3) एखाद्या देशातील व्यक्ती अथवा व्यक्तीसमूह जेव्हा त्याच देशात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी स्थलांतर करते तेव्हा त्यास
     .................... स्थलांतर म्हणतात.
   1) सक्तीचे    2) अंतर्गत   
   3) आंतरराष्ट्रीय    4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2

4) नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
   1) अकोला    2) बुलढाणा   
   3) वाशिम    4) हिंगोली
उत्तर :- 1

5) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील ........................... क्रमाकांवर देश आहे.
   1) तीन    2) पाच     
   3) सात    4) नऊ
उत्तर :- 3

1 comment:

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...