Thursday, 27 February 2020

गीता सेन यांना प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार मिळाला:-

📚भारतीय स्त्रीवादी विद्वान आणि कार्यकर्त्या गीता सेन यांना प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार मिळाला आहे.

📚डॅन डेव्हिड फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार सेन यांना स्त्री-पुरुष समानता (वर्तमान श्रेणी) या गटात दिला जात आहे.

📚डेबोरा डिनीझ आणि सेन यांना हा पुरस्कार संयुक्तपणे दिला जात आहे. डेबोरा डिनीझ हे इंटरनॅशनल प्लान्ड पॅरेन्टहुड फेडरेशन-वेस्टर्न हेमिस्फेयर रिजन यासाठी हक्क व न्याय केंद्राचे उपसंचालक आहेत.

📚इस्राएल देशातल्या तेल अवीव विद्यापीठात मुख्यालय असलेल्या डॅन डेव्हिड फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार देण्यात येत आहे.

📚मे 2020 या महिन्यात तेल अवीव येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात तीन गटात सहा जणांना हा सन्मान दिला जाणार आहे.

📚गीता सेन विषयी:-

📚सेन यांना लोकसंख्येबाबतचे धोरण, प्रजनन आणि आरोग्य, दारिद्र्य, महिलांचे हक्क, कामगार पेठ आणि जागतिक प्रशासन अक्षय क्षेत्रांमधल्या त्यांनी केलेल्या कामासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

📚सेन हार्वर्ड विद्यापीठात जागतिक आरोग्य आणि लोकसंख्येच्या एक संलग्न प्राध्यापक आहेत आणि ती भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) बेंगळुरू येथे सार्वजनिक धोरणाच्या प्राध्यापकही राहिलेल्या आहेत.

📚त्या ‘पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया’ येथे ‘रामालिंगास्वामी सेंटर ऑन इक्विटी अँड सोशल डिटेर्मिनेंट्स ऑफ हेल्थ’ याच्या संचालिका आहेत.

📚सांस्कृतिक जतन आणि पुनरुज्जीवन (भूतकाळ श्रेणी) - लोनी जी. बंच तिसरा (वॉशिंग्टन, अमेरिका) आणि बारबरा किर्शेनब्लाट-गिम्ब्लेट (न्यूयॉर्क विद्यापीठ)

📚कृत्रिम बुद्धिमत्ता (भविष्य श्रेणी) - डेमिस हसाबिस आणि अ‍ॅमनोन शाशुआ (जेरुसलेमचे हिब्रू विद्यापीठ).

पुरस्काराविषयी-

📚डॅन डेव्हिड पुरस्कार दरवर्षी जागतिक स्तरावर प्रेरणा देणार्‍या व्यक्ती आणि संस्थांना दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. इस्राएल देशातल्या तेल अवीव विद्यापीठात मुख्यालय असलेल्या डॅन डेव्हिड फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.

📚पुरस्कार स्वरूपात प्रत्येकी एक दसलक्ष डॉलर एवढ्या रोख रकमेसह तीन पुरस्कार दिले जातात. एकूण तीन दशलक्ष डॉलर एवढ्या मूल्यांसह हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वाधिक मूल्य असलेल्या पुरस्कारांपैकी एक आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...