- आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा दिला. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत वराडकर यांच्या फाईन गेईल पक्षाची पीछेहाट झाली. त्यामुळे ते पंतप्रधान पदावरून पायउतार झाले.
- आयर्लंडमध्ये नुकतीच निवडणूक झाली. त्या निवडणुकीत कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. फेरनिवडीसाठी वराडकर खासदारांचे आवश्यक संख्याबळ पाठिशी उभे करू शकले नाहीत. आता नवे सरकार स्थापन होईपर्यंत 41 वर्षीय वराडकर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळतील.
- त्यांनी 2017 मध्ये सुत्रे स्वीकारली त्यावेळी ते आयर्लंडचे सर्वांत तरूण पंतप्रधान ठरले. वराडकर यांचे पूर्वज मूळचे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. काही महिन्यांपूर्वी केलेल्या भारत दौऱ्यात त्यांनी आवर्जून मूळगावाला भेट दिली होती
————————————————--
No comments:
Post a Comment