Wednesday, 26 February 2020

राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण योजना

खालील काही सेवाही अंतर्भूत केल्या    आहेत.

      1) हत्तीरोग नियंत्रण पथक

2)    हत्तीरोगासाठी रात्रीचे दवाखाने

राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण योजना जवळ जवळ 50 वर्ष जुनी आहे. तरीही अद्यापपर्यंत या योजनेला भक्कम यश मिळालेले नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर, भंडारा, इ. पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये हा आजार जास्त करून आढळतो. याचे कारण म्हणजे हा आजार एकूणच आपल्या देशाच्या पूर्व भागात जास्त आढळतो. दक्षिण भागात मात्र केरळमध्येही याचे पुष्कळ प्रमाण आहे. ही योजना मुख्यत: हत्तीरोग्रस्त जिल्ह्यांमध्ये राबवली जाते. सध्या या योजनेतून मुख्यत: चार सेवा दिल्या जातात. यात डासांच्या अळयांविरुध्द मोहीम, जंतवाहक व्यक्तींना उपचार,हत्तीरोगग्रस्त भागात सर्वांना डाकाझिनचा (डी.ई.सी) उपचार आणि अंडकोष सूज असल्यास शस्त्रक्रिया आणि नसबंदी.

3) हत्तीरोग सर्वेक्षण

जागोजागी स्वैल नमुना पध्दतीने हत्तीरोगासाठी सर्वेक्षणे केली जातात. महाराष्ट्रात ठाणे, पुणे, नागपूर, अकोला, नाशिक आणि औरंगाबाद या सहा ठिकाणी सर्वेक्षण पथके आहेत. राज्यातील मुंबई सोडून सर्व जिल्ह्यांची सर्वेक्षणे पूर्ण झालेली आहेत. अर्थातच परत परत सर्वेक्षणे करावी लागतातच.

यामध्ये खालील काही सेवाही अंतर्भूत केल्या आहेत.

- अंडकोशासाठी शस्त्रक्रिया शिबिरे. यामुळे हत्तीरोग रुग्णांची माहिती मिळते.

- पाणी साठयांमध्ये गप्पी मासे सोडणे. डास रोधक फवारणी करणे. (अबेट, बेटेक्स आणि एम.एल.ओ ही तीन अळीनाशके यासाठी वापरली जातात.)

- हत्तीरोगग्रस्त रुग्णांसाठी दवाखाने चालवली जातात. यातून हत्तीरोगाच्या प्रादुर्भावाबद्दल जास्त माहिती मिळते.

- काही ठिकाणी डास निर्मिती कमी करण्यासाठी काही किरकोळ बांधकाम व दुरुस्ती केली जाते. (उदा. ड्रेनेज वाहून जाण्यासाठी)

- आरोग्य शिक्षण. 2004 साली केलेल्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात सुमारे66000रुग्ण सापडले. यापैकी 27000 अंडकोष सूजेचे तर सुमारे 39000 हात किंवा पाय यावर सूज येण्याचे रुग्ण होते

4) हत्तीरोग नियंत्रण पथक

या पथकाची मुख्य कामगिरी म्हणजे हत्तीरोग वाहक डासांची संख्या कमी करण्यासाठी निरनिराळे उपाय योजणे. यासाठी संभाव्य पाणी साठयांवर डास अळी नाशक फवारे दर आठवडयास करणे हे प्रमुख धोरण असते. यानंतर त्याचा किती उपयोग झाला आहे याचे मोजमाप पण केले जाते. याच पथकाची दुसरी महत्त्वाची जबाबदारी म्हणजे संभाव्य रुग्ण शोधून त्यांना उपचार करणे.

महाराष्ट्रात जून 2000 मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार पुढीलप्रमाणे 14 जिल्हे हत्तीरोगग्रस्त आढळले आहेत. सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया,यवतमाळ, अमरावती, जळगाव, नंदूरबार, ठाणे,

सिंधूदुर्ग आणि नांदेड. या जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे दीड कोटी लोकांना सामूहिक उपचार करण्यात आले. याप्रमाणे 2005-06मध्ये देखील हिवाळयात18 जिल्ह्यांमध्ये सामूहिक उपचार करण्यात आले आहेत वरील14 जिल्ह्यांव्यतिरिक्त यात रत्नागिरी, लातूर, उस्मानाबाद व अकोला यांचा समावेश होतो. सामूहिक उपचार आणखी 5 वर्ष चालूच राहणार आहेत.

2007-08 साली सुमारे 1 कोटी व्यक्तींची हत्तीरोगासाठी तपासणी करण्यात आली. यामध्ये 4700 रक्तनमुन्यात दोष आढळला आणि एकूण 655 नवीन रुग्ण आढळले. यावर्षी 4250 व्यक्तींच्या अंडकोश शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

हत्तीरोग नियंत्रण योजना यशस्वी होण्यासाठी लोकांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. हत्तीरोगग्रस्त विभागात घरांमध्ये डासनाशक फवारणी ही अत्यावश्यक गोष्ट आहे. यासाठीच मुख्य सहकार्य लागते. तसेच या आजाराच्या लक्षणांनुसार आरोग्यकेंद्रात येऊन लवकर उपचार घेणे हेही महत्त्वाचे आहे. आरोग्य शिक्षणासाठी सुधारित उपचार पध्दतींचा प्रसार महत्त्वाचा आहे. यात हत्तीरोग झालेला पाय रोज साबण पाण्याने धुवावा. त्यामुळे घाण व जंतू निघून जातात. यासाठी दुस-या व्यक्तीची मदत लागते. यानंतर पाय कोरडया फडक्याने किंवा पंख्याच्या हवेने कोरडा करावा. पाय कोरडा झाल्यामुळे जंतूंची वाढ थांबते. जखमांची काळजी वेळच्या वेळी घेणे आवश्यक आहे. यात साबणपाण्याने स्वच्छता, जखम कोरडी करणे आणि त्यानंतर जंतूनिरोधक मलम लावावे. पायावर सूज असल्यास क्रेप बँडेज बांधून घ्यावे. म्हणजे सूज कमी होते.

पादत्राणे निवडताना आरामदायक, भरपूर हवा देणारी, घाम न आणणारी आणि इजा न करणारी, न घासणारी, पादत्राणे वापरावीत यासाठी कॅनव्हास म्हणजे कापडी पादत्राणे

चांगली असतात.

पायामध्ये रक्तप्रवाह खेळता ठेवण्यासाठी पायाचा हलका व्यायाम करत राहणे आवश्यक आहे. उभे असताना देखील पाय मागेपुढे आणि वर्तुळाकार फिरवायला पाहिजे.

पायाला सूज आली असल्यास रात्री झोपताना आणि दिवसा बसताना शरीरापेक्षा पाय थोडा उंच करून ठेवणे महत्त्वाचे असते. यामुळे सूज कमी होते व नुकसान टळते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...