०३ फेब्रुवारी २०२०

नेपाळने जगाच्या उंचस्थानी फॅशन शो आयोजित करण्याचा विश्वविक्रम केला

🔰26 जानेवारी 2020 रोजी नेपाळ या देशाने समुद्रसपाटीपासून सर्वोच्च उंचीवर फॅशन शोचा कार्यक्रम आयोजित केला आणि नवा विश्वविक्रम केला आहे.

🔰हा कार्यक्रम एव्हरेस्ट बेस कॅम्पजवळ काला पत्थर येथे 5340 मीटर (17515 फूट) उंचीवर आयोजित करण्यात आला होता. या घटनेची नोंद गिनीज ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड या पुस्तकात झाली.

🔰“माउंट एव्हरेस्ट फॅशन रनवे” नावाचा हा कार्यक्रम नेपाळ पर्यटन विभागाच्या समर्थनाने RB डायमंड्स आणि KASA स्टाईल या कंपन्यांनी आयोजित केला होता. इटली, फिनलँड, श्रीलंका आणि सिंगापूरसह जगातल्या विविध भागातून आलेल्या मॉडेल लोकांनी या कार्यक्रमात भाग घेतला.

🔴नेपाळ देश.

🔰नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. हा हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. उत्तरेला चीन देशाची सीमा असून, इतर सर्व बाजूंना भारत देश आहे. नेपाळ हा आयताक्रुती राष्ट्रध्वज नसलेला जगातला एकमेव देश आहे. काठमांडू हे नेपाळचे राजधानी शहर आहे आणि नेपाळी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.

🔰उत्तरेला हिमालय पर्वतरांगा असून जगातल्या सर्वोच्च दहा पर्वतशिखरांमधील आठ नेपाळमध्ये आहेत. जगातले सर्वोच्च शिखर म्हणजेच ‘एव्हरेस्ट’ नेपाळमध्ये आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...