- भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ अमेरिकेत चालू वर्षात संशोधनासह स्वतःचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणार आहे. या अभ्यासक्रमासाठी एप्रिलपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठ अधिकाऱयांनी दिली आहे.
- विवेकानंद योग विद्यापीठ 50 लाख डॉलर्सच्या अर्थसंकल्पासह लॉस एंजिलिस शहरात उभारण्यात आले आहे.
- केस वेस्टर्न विद्यापीठातील प्राध्यापक श्रीनाथ यांना योग विद्यापीठाशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर भारतीय योगगुरु एच.आर. नागेंद्र याचे अध्यक्ष असतील. अभ्यासक्रम ऑगस्ट 2020 पासून सुरू होणार आहे.
- विद्यापीठाने योगवर आधारित उच्चशिक्षण उपलब्ध करण्यासाठी नोव्हेंबर 2019 मध्ये ब्युरो फॉर प्रायव्हेट पोस्टसेकंड्री एज्युकेशन, कॅलिफोर्नियाकडून अधिकृत मान्यता प्राप्त केल्याच्या तीन महिन्यांमध्येच ही घोषणा केली आहे.
- ‘वायु’ची संकल्पना नासाचे माजी वैज्ञानिक नागेंद्र यांचीच आहे. नागेंद्र हे मागील 4 दशकांपासून योगप्रसार तसेच त्याच्या शिक्षणासाठी कार्यरत आहेत.
- भारतात 2002 मध्ये पहिले योग विद्यापीठ स्थापन करण्यात आले होते. त्यानंतरच नागेंद्र यांनी योगवर आधारित उच्चशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता.
- विद्यापीठामुळे अमेरिकेतील हजारो योगशिक्षकांना मदत मिळणार असल्याचे विधान विद्यापीठाच्या संचालक मंडळाचे सदस्य प्रेम भंडारी यांनी केले आहे
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
२० फेब्रुवारी २०२०
जगातील पहिले योग विद्यापीठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Latest post
महाराष्ट्रातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇 महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 👉 १ मे १९६० महाराष्ट्राची राजधानी कोणती? 👉 मबई महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव? 👉 नागपूर म...
-
1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा? उत्तर- सोलापूर 2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? उत्तर...
-
1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात. 1. डोंगरी वारे 2. दारिय वारे ✅ 3. स्थानिक वारे 4. या पैकी नाही 2⃣ पथ्वीवर चंद्राचे आ...
-
१. खालीलपैकी कोणत्या शास्त्राला सामाजिक शास्त्र मानले जाते? अ) पदार्थ विज्ञान ब) राज्यशास्त्र✅ क) प्राणी शास्त्र द) रसायनशास्त्र २………………या भ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा