- भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ अमेरिकेत चालू वर्षात संशोधनासह स्वतःचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणार आहे. या अभ्यासक्रमासाठी एप्रिलपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठ अधिकाऱयांनी दिली आहे.
- विवेकानंद योग विद्यापीठ 50 लाख डॉलर्सच्या अर्थसंकल्पासह लॉस एंजिलिस शहरात उभारण्यात आले आहे.
- केस वेस्टर्न विद्यापीठातील प्राध्यापक श्रीनाथ यांना योग विद्यापीठाशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर भारतीय योगगुरु एच.आर. नागेंद्र याचे अध्यक्ष असतील. अभ्यासक्रम ऑगस्ट 2020 पासून सुरू होणार आहे.
- विद्यापीठाने योगवर आधारित उच्चशिक्षण उपलब्ध करण्यासाठी नोव्हेंबर 2019 मध्ये ब्युरो फॉर प्रायव्हेट पोस्टसेकंड्री एज्युकेशन, कॅलिफोर्नियाकडून अधिकृत मान्यता प्राप्त केल्याच्या तीन महिन्यांमध्येच ही घोषणा केली आहे.
- ‘वायु’ची संकल्पना नासाचे माजी वैज्ञानिक नागेंद्र यांचीच आहे. नागेंद्र हे मागील 4 दशकांपासून योगप्रसार तसेच त्याच्या शिक्षणासाठी कार्यरत आहेत.
- भारतात 2002 मध्ये पहिले योग विद्यापीठ स्थापन करण्यात आले होते. त्यानंतरच नागेंद्र यांनी योगवर आधारित उच्चशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता.
- विद्यापीठामुळे अमेरिकेतील हजारो योगशिक्षकांना मदत मिळणार असल्याचे विधान विद्यापीठाच्या संचालक मंडळाचे सदस्य प्रेम भंडारी यांनी केले आहे
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
Ads
20 February 2020
जगातील पहिले योग विद्यापीठ
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment