- लंडनविकसनशील देशांमधील विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यापीठांनी चांगली कामगिरी केली असून, विकसनशील देशांतील पहिल्या १००
- विकसनशील देशांमधील विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यापीठांनी चांगली कामगिरी केली असून, विकसनशील देशांतील पहिल्या १०० विद्यापीठांत भारतातील ११ विद्यापीठांचा समावेश आहे. 'टाइम्स हायर एज्युकेशन (टीएचई) इमर्जिंग इकॉनॉमिज युनिव्हर्सिटी रँकिंग्ज २०२०'मध्ये या विद्यापीठांचा समावेश झाला आहे.
- जगातील एकूण ४७ देशांमधील विद्यापीठांचा या यादीत समावेश आहे. पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये भारतापेक्षा केवळ चीनची विद्यापीठे अधिक असून, त्यांची संख्या ३० इतकी आहे. मंगळवारी सायंकाळी लंडन येथे हे रँकिंग जाहीर करण्यात आले.
- विकसशील देशांतील विद्यापीठांच्या पूर्ण रँकिंगमध्ये ५५३ विद्यापीठांत भारतातील ५६ विद्यापीठांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) ही भारतीय संस्था यादीत १६व्या स्थानी आहे, तर इंडिय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) ही संस्था त्यानंतरच्या क्रमांकावर आहे.
- 'जागतिक क्रमवारीत भारतीय विद्यापीठांच्या यशाबद्दल दीर्घकाळापासून चर्चा होत आली आहे, तसेच जागतिक पातळीवर भारतीय विद्यापीठांची कामगिरी कमी राहिलेली आहे,' असे 'टीएचई'चे चीफ नॉलेज ऑफिसर फिल बॅटी म्हणाले. 'इमर्जिंग इकॉनॉमिज युनिव्हर्सिटी रँकिंग्ज २०२०'मध्ये विविध संस्थांनी केलेली प्रगती दिसून येते, असेही त्यांनी सांगितले.
- भारत सरकारने २०१७मध्ये इन्स्टिट्यूट्स ऑफ एमिनन्स स्कीम सुरू केली. त्यामध्ये सहभागी झालेल्या अमृता विश्वविद्यापीठमने या यादीतील पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे. २०१९मध्ये हे विद्यापीठ १४१व्या स्थानी होते. यंदा या विद्यापीठाचे स्थान ५१ वे आहे, असेही 'टीएचई'ने म्हटले आहे. इन्स्टिट्यूट्स ऑफ एमिनन्स स्कीम योजनेतील विद्यापीठांपैकी आयआयटी खरगपूर, आयआयटी दिल्ली, आयआयटी मद्रास यांचाही या यादीत समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रोपर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी या संस्थांचा पहिल्या १०० विद्यापीठांत प्रथमच समावेश झाला आहे.
————————————————
No comments:
Post a Comment