Thursday, 6 February 2020

रिझर्व्ह बँकेकडून नवे पतधोरण जाहीर


चालू आर्थिक वर्षाच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांसाठी आज (दि.6) रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले आहे.

या पतधोरणात कर्जदारांना फारसा दिलासा मिळालेला नाही. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीने अपेक्षेप्रमाणेच रेपो दर कायम ठेवला आहे.

पुढील दोन महिन्यांसाठी रेपो रेट 5.15 टक्के राहणार असून, सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कायम ठेवला आहे.

पतधोरण आढावा समितीची द्विमासिक पतधोरण बैठक दोन दिवसापासून सुरू होती. पुढील महिन्यांसाठी रिझर्व्ह बँक काय धोरण अवलंबणार याकडे लक्ष लागले होते.

अखेर आज रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले. या बैठकीत पतधोरण आढावा समितीच्या सर्व सहा सदस्यांनी रेपो रेट कायम ठेवण्याची भूमिका घेतली.

किरकोळ वाढती महागाई आणि अर्थव्यवस्थेची बिकट अवस्था या पार्श्वभूमीवर आरबीआयने रेपो रेट 5.15  टक्के कायम ठेवला आहे.

त्यामुळे कर्जदारांना आहे त्याच व्याजदराने कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. 2020-21 या वर्षात जीडीपी 6 टक्के राहणार असल्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच join करा

No comments:

Post a Comment