१९०० मध्ये पंजाबात जमिनीच्या हस्तांतरणाचा कायदा अमलात आणला.
ज्याअन्वये शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांना जमिनी घेण्यास बंदी घातली.
१९०१ मध्ये शेतकी खात्याची स्थापना केली. त्याने कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली. बंगाल प्रांतातील पुसा येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली.
सावकारांच्या पाशातून शेतकऱ्याची मुक्ती होण्यासाठी १९०४ मध्ये सहकारी पतपेढी कायदा केला. कर्झनच्या कालावधीत पुष्कळ नवीन रेल्वेमार्ग (सहा हजार मल लांब) बांधले. रेल्वे कारभारात कार्यक्षमतेसाठी सर रॉबर्टसन समिती नेमली.
कर्झनने ताजमहलचे सौंदर्य वाढविण्यासाठी इराणहून दिवे आणले. ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शविण्यासाठी कलकत्ता येथे राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल उभारला.
कर्झनने बंगलोर येथे सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची स्थापना केली.
No comments:
Post a Comment