🎆 सोमालियामध्ये टोळ किड्यांची संख्या इतक्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे की तेथे अन्न धान्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील कृषीमंत्रालयाने आणीबाणीची घोषणा करण्याची मागणी सरकारकडे केल्यानंतर आणीबाणी घोषित केली आहे.
🎆 सोमालियाच्या कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “टोळांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली आहे. टोळधाडीचे प्रमाण वाढल्यामुळे देशातील अन्नधान्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. लोकांना अन्नधान्य पुरवणारी पिके या टोळधाडींमुळे नष्ट होत आहेत.
🎆 देशभरामध्ये अनेक ठिकाणी एकाचवेळी टोळांची संख्या हजारोंनी वाढली असून हे टोळ सामान्यपेक्षा मोठ्या आकाराचे आहेत. हे टोळ मोठ्याप्रमाणात पिके खात असल्याने देशाचा अन्नसुरक्षा कार्यक्रम धोक्यात आला आहे.”
✅ वाळवंटी टोळ म्हणजे काय?
🎆 सोमालियामध्ये ज्या टोळ किटकांमुळे आणीबाणी घोषित करण्यात आली आहे ते टोळ वाळवंटी टोळ म्हणून ओळखले जातात.
🎆 नाकतोडा प्रकारातील हे किटक टोळीटोळीने झाडांच्या पानांवर राहतात. प्रजननाच्या काळात यांची संख्या हजारोंच्या पटीत वाढते. आफ्रिकन देशांमध्ये अनेकदा पिकांवर किड लागते. टोळधाडही या भागातील देशांसाठी नवीन नाही. मात्र यंदा या टोळधाडींचे प्रमाण वाढले आहे. मागील २५ वर्षांमधील सर्वात वाईट परिस्थिती यंदा असल्याचे स्थानिक सांगतात.
✅ आधीही पडल्या आहेत टोळधाडी :
🎆 याआधीही सोमालियामध्ये १९९० च्या दशकामध्ये सहा वेळा अशाप्रकारे मोठ्याप्रमाणात टोळधाडींने उच्छाद मांडला होता. त्यानंतर २००३-०४ सालीही मोठ्याप्रमाणात अन्नधान्याची नासधूस केली होती.
No comments:
Post a Comment