२७ फेब्रुवारी २०२०

भारताच्या दिव्या काकराचा ‘सुवर्ण’ विजय.

🔰आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या दिव्या काकरा हिने सुवर्ण पदकाची कमाई केली.

🔰तसेच या स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी दिव्याने सुवर्ण पदक मिळवून भारताला चांगली सुरुवात करून दिली.

🔰भारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरा हिने गुरुवारी 68 किलो वजनी गटात हा विजय संपादन केला. दिव्याने जपानचा कुस्तीपटू नरुहा मत्सुयुकी हिचा पराभव केला आणि सुवर्ण कमाई केली.

🔰तसेच 68 किलो वजनी गटात हा सामना गॉल रॉबिन  स्वरूपात खेळला गेला. या सामन्यात दिव्याने कझाकस्तान, मंगोलिया, उझबेकिस्तान आणि जपानच्या खेळाडूंना पराभूत केले आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.

🔰नवी दिल्लीतील केडी जाधव स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दिव्याने दमदार कामगिरी केली. भारतासाठी हे स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक ठरले. दोन सुवर्णपदकांसह आता भारताने एकूण सहा पदके जिंकली आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

19 april महत्त्वपूर्ण चालू घडामोडी MCQ

१. कोणत्या राज्यात अलीकडेच उत्खननामुळे सर्वात उंच जैन मूर्ती धोक्यात आली ? अ. राजस्थान / राजस्थान बी. कर्नाटक C. मध्य प्रदेश D. तेलंगणा उत्त...