Tuesday, 11 February 2020

याआधी कधी कधी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर झाली होती


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अत्यंत टोकाची स्थिती असेल, तेव्हाच जागतिक आरोग्य संघटना 'जागतिक आरोग्य आणीबाणी' जाहीर करते. गेल्या काही वर्षात चारवेळा अशी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.

स्वाईन फ्ल्यू (2009) - H1N1 व्हायरसने 2009 साली धुमाकूळ घातला होता. जगभरात हा व्हायरस पसरत होता. टेलीग्राम चॅनल एमपीएससी हब. जवळपास दोन लाख लोकांना या विषाणूची लागण झाली होती. त्यावेळी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.

पोलिओ (2014) - पोलिओचं 2012 साली पूर्णपणे निर्मुलन झाल्याचं बोललं जात असतानाच, 2013 साली पुन्हा या रोगानं डोकं वर काढलं. त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेनं आणीबाणी जारी करत वेगानं पावलं उचलली होती.

झिका (2016) - अमेरिकेमध्ये झिका व्हायरस इतक्या झपाट्यानं पसरला होता की, 2016 साली जागतिक आरोग्य संघटनेनं तात्काळ सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जारी केली आणि झिकाविरोधात लढण्यासाठी संशोधनाला प्रोत्साहन दिलं. टेलीग्राम चॅनल एमपीएससी हब.  झिकाची लक्षणं सौम्य होती, मात्र याचा सगळ्यात जास्त त्रास गर्भवती महिलांना होत होता.

इबोला (2014 आणि 2019) - पश्चिम आफ्रिकेत इबोला व्हायरसनं अक्षरश: उच्छाद मांडला होता. 11 हजारहून अधिक जणांचा जीव इबोलानं घेतला. याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेनं ऑगस्ट 2014 ते मार्च 2016 या काळात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली. इबोलानं गेल्या वर्षी म्हणजे 2019 साली डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो या देशात डोकं वर काढलं होतं. टेलीग्राम चॅनल एमपीएससी हब. त्यावेळीही सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.

No comments:

Post a Comment