1) धूपे बरोबर खालीलपैकी कोणते मुख्य अन्नद्रव्य जास्त प्रमाणात निघून जाते ?
1) नत्र 2) पालाश
3) स्फुरद 4) लोह
उत्तर :- 3
2) साधारणत: जमिनीची सच्छिद्रता किती असते ?
1) 20 ते 30% 2) 30 ते 35%
3) 30 ते 60% 4) 60 ते 70%
उत्तर :- 3
3) खालीलपैकी कोणते पीक मृदा व पाणी संधारण साधण्यासाठी उपयुक्त आहे ?
1) मका 2) ज्वारी
3) बाजरी 4) चवळी
उत्तर :- 4
4) जमिनीची धूप थांबविण्यासाठी पहिली पायरी म्हणजे.................. थांबविणे.
1) पाण्याचा प्रवाह 2) वा-याचा वेग
3) मातीचे विभक्तीकरण 4) झाडांची वाढ
उत्तर :- 3
5) कमी ते मध्यम पावसाच्या भागामध्ये समपातळीत बांध असलेल्या काळया जमिनीवर कोणत्या प्रकारच्या टेरेसिंगचा वापर
करतात?
1) झिंग टेरेसिंग 2) बेंच टेरेसिंग
3) ग्रेडेड टेरेसिंग 4) वरील सर्व
उत्तर :- 1
1) ठाळीचे बांध कोणत्या ठिकाणी घेतले जातात ?
अ) जमीन पाण्याच्या धुपेला कमी ग्रहणशील आहे तेथे ब) मातीची पारगम्यता कमी आहे तेथे
क) दलदलीच्या जमिनीत ड) जास्त उताराच्या जमिनीत
उत्तर :- 3
2) मृदेची सच्छिद्रता (Porosity) जर 50% आहे तर छिद्र गुणोत्तर (void ratio) ......................... इतके असेल.
1) 0.5 2) 1.0 3) 2.0 4) 5.0
उत्तर :- 2
3) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) जमिनीची वा-यामुळे होणारी धुप जमिनीची पारगम्यता बदलून गंभीर स्वरुपाची हानी घडवून आणते.
ब) हिस्टोसोल्स यांनी नैसर्गिक / जैविक मृदा म्हणतात.
1) केवळ अ 2) केवळ ब 3) दोन्ही 4) एकही नाही
उत्तर :- 2
4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) लॅटरीटिक मृदा मोसमी हवामानाच्या प्रदेशात आढळते.
ब) लॅटरीटिक मृदा लोह, ॲल्युमिनियम, पोटॅश व चुनखडीयुक्त आहेत.
1) केवळ अ 2) केवळ ब 3) दोन्ही 4) एकही नाही
उत्तर :- 1
5) जमिनीचा उतार ................ टक्केपेक्षा जास्त असतो तेव्हा कंटूर चर तांत्रिकदृष्टया किंवा आर्थिकदृष्टया फायदेशीर ठरत नाहीत.
1) 10 2) 15 3) 20 4) 25
उत्तर :- 3
1) चांगल्या पोयटयाच्या मातीत पोयटयाचे प्रमाण साधारण ....................... टक्के असते.
1) 10-20 2) 20-30
3) 30-50 4) 60-75
उत्तर :- 3
2) अपपर्णन हा खालीलपैकी कोणत्या विदारणाचा प्रकार आहे ?
1) रासायनिक 2) कायिक/भौतिक
3) जैविक 4) भस्मीकरण
उत्तर :- 2
3) जास्तीत जास्त जीवाणूंची संख्या जमिनीच्या (मातीच्या) ‘अ’ थरामध्ये का असते ?
1) मातीची ‘अ’ थरामध्ये जास्त अन्नद्रव्ये असतात. 2) मातीची ‘अ’ थरामध्ये सुपीकता अधिक असते.
3) मातीची ‘अ’ थरामध्ये जलसंपृक्त असतो. 4) मातीची ‘अ’ थरामध्ये भरपूर सेंद्रीय पदार्थ असतात.
उत्तर :- 4
4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) विम्लधर्मीय आणि क्षारयुक्त विम्लधर्मीय जमिनी पुन:प्रापण करण्यासाठी (सुधारण्यासाठी) सल्फर वापरतात.
ब) क्षारयुक्त जमिनीमध्ये विनिमयात्मक सोडियमची टक्केवारी 15 पेक्षा अधिक असते.
1) केवळ अ 2) केवळ ब 3) दोन्ही 4) एकही नाही
उत्तर :- 1
5) विधाने वाचून खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
अ) रेगूर मृदा ही मुख्यत्वे नद्यांच्या खो-यात, पठारी प्रदेशात सापडते.
ब) जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी व जांभी मृदा तर किनारी प्रदेशात करडया रंगाची मृदा आढळते.
1) विधान अ बरोबर 2) विधान ब बरोबर
3) दोन्ही विधाने बरोबर 4) दोन्ही विधाने चूक
उत्तर :- 3
1) माती (मृदा) तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये पदार्थ पाण्याबरोबर वाहत जाऊन जमा होतात ते म्हणजे
अ) कोलूव्हियम ब) लॅक्यूस्ट्राइन क) ॲल्यूव्हीयम ड) टिल
1) अ 2) अ व ब 3) क 4) ड
उत्तर :- 3
2) वरून वाहणा-या पाण्यामुळे उताराच्या जमिनीमधून समप्रमाणात पातळ थरामध्ये माती निघून जाणे याला .................... असे
म्हणतात.
1) ओघळपाडी धूप 2) घळई धूप 3) सालकाढी धूप 4) शिंतोडे धूप
उत्तर :- 3
3) दरवर्षी आपल्या देशात अंदाजे किती मातीची धूप होते ?
1) 12 अब्ज टन 2) 100 अब्ज टन 3) 329 अब्ज टन 4) 120 अब्ज टन
उत्तर :- 1
4) मातीचा .................... गुणधर्म कमी करण्यासाठी ऊसाची मळी मातीमध्ये मिसळली जाते.
1) क्षार 2) विम्ल 3) अम्ल 4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2
5) जमिनीमध्ये असणारे पर्याप्त सेंद्रीय पदार्थ किंवा ह्युमस हे जमिनीची ......................... वाढवितात.
अ) जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता
ब) अंतर्गलन (जमिनीत पाणी प्रवेश करण्याचा वेग/ दर)
क) सच्छिद्रता
1) अ आणि ब फक्त 2) ब आणि क फक्त
3) अ आणि क फक्त 4) अ, ब आणि क
उत्तर :- 4
Borgata Casino and Hotel | Online Sports Betting
उत्तर द्याहटवाBorgata is owned by Atlantic City 비트 카지노 Resorts and operated 카지노딜러연봉 by Caesars Entertainment. It is owned by the casino bet365 실시간 배당 흐름 and features a restaurant, a 룰렛 배팅 bar 마닐라카지노 and a casino.