Friday, 25 November 2022

भूगोल प्रश्नसंच

1) धूपे बरोबर खालीलपैकी कोणते मुख्य अन्नद्रव्य जास्त प्रमाणात निघून जाते ?
   1) नत्र      2) पालाश   
   3) स्फुरद    4) लोह   
उत्तर :- 3

2) साधारणत: जमिनीची सच्छिद्रता किती असते ?
   1) 20 ते 30%    2) 30 ते 35%   
   3) 30 ते 60%    4) 60 ते 70%
उत्तर :- 3

3) खालीलपैकी कोणते पीक मृदा व पाणी संधारण साधण्यासाठी उपयुक्त आहे ?
   1) मका    2) ज्वारी     
   3) बाजरी    4) चवळी
उत्तर :- 4

4) जमिनीची धूप थांबविण्यासाठी पहिली पायरी म्हणजे.................. थांबविणे.
   1) पाण्याचा प्रवाह    2) वा-याचा वेग
   3) मातीचे विभक्तीकरण    4) झाडांची वाढ
उत्तर :- 3

5) कमी ते मध्यम पावसाच्या भागामध्ये समपातळीत बांध असलेल्या काळया जमिनीवर कोणत्या प्रकारच्या टेरेसिंगचा वापर
     करतात?
   1) झिंग टेरेसिंग      2) बेंच टेरेसिंग
   3) ग्रेडेड टेरेसिंग      4) वरील सर्व
उत्तर :- 1

1) ठाळीचे बांध कोणत्या ठिकाणी घेतले जातात ?
   अ) जमीन पाण्याच्या धुपेला कमी ग्रहणशील आहे तेथे    ब) मातीची पारगम्यता कमी आहे तेथे
   क) दलदलीच्या जमिनीत           ड) जास्त उताराच्या जमिनीत
उत्तर :- 3

2) मृदेची सच्छिद्रता (Porosity) जर 50% आहे तर छिद्र गुणोत्तर (void ratio) ......................... इतके असेल.
   1) 0.5      2) 1.0      3) 2.0      4) 5.0
उत्तर :- 2

3) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
   अ) जमिनीची वा-यामुळे होणारी धुप जमिनीची पारगम्यता बदलून गंभीर स्वरुपाची हानी घडवून आणते.
   ब) हिस्टोसोल्स यांनी नैसर्गिक / जैविक मृदा म्हणतात.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 2

4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
   अ) लॅटरीटिक मृदा मोसमी हवामानाच्या प्रदेशात आढळते.
   ब) लॅटरीटिक मृदा लोह, ॲल्युमिनियम, पोटॅश व चुनखडीयुक्त आहेत.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 1

5) जमिनीचा उतार ................ टक्केपेक्षा जास्त असतो तेव्हा कंटूर चर तांत्रिकदृष्टया किंवा आर्थिकदृष्टया फायदेशीर ठरत नाहीत.
   1) 10      2) 15      3) 20      4) 25
उत्तर  :- 3

1) चांगल्या पोयटयाच्या मातीत पोयटयाचे प्रमाण साधारण ....................... टक्के असते.
   1) 10-20    2) 20-30   
   3) 30-50    4) 60-75
उत्तर :- 3

2) अपपर्णन हा खालीलपैकी कोणत्या विदारणाचा प्रकार आहे ?
   1) रासायनिक    2) कायिक/भौतिक   
   3) जैविक    4) भस्मीकरण
उत्तर :- 2

3) जास्तीत जास्त जीवाणूंची संख्या जमिनीच्या (मातीच्या) ‘अ’ थरामध्ये का असते ?
   1) मातीची ‘अ’ थरामध्ये जास्त अन्नद्रव्ये असतात.    2) मातीची ‘अ’ थरामध्ये सुपीकता अधिक असते.
   3) मातीची ‘अ’ थरामध्ये जलसंपृक्त असतो.      4) मातीची ‘अ’ थरामध्ये भरपूर सेंद्रीय पदार्थ असतात.
उत्तर :- 4

4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे  ?
   अ) विम्लधर्मीय आणि क्षारयुक्त विम्‍लधर्मीय जमिनी पुन:प्रापण करण्यासाठी (सुधारण्यासाठी) सल्फर वापरतात.
   ब) क्षारयुक्त जमिनीमध्ये विनिमयात्मक सोडियमची टक्केवारी 15 पेक्षा अधिक असते.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 1

5) ‍विधाने वाचून खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
   अ) रेगूर मृदा ही मुख्यत्वे नद्यांच्या खो-यात, पठारी प्रदेशात सापडते.
   ब) जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी व जांभी मृदा तर किनारी प्रदेशात करडया रंगाची मृदा आढळते.
   1) विधान अ बरोबर    2) विधान ब बरोबर
   3) दोन्ही विधाने बरोबर    4) दोन्ही विधाने चूक
उत्तर :- 3 

1) माती (मृदा) तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये पदार्थ पाण्याबरोबर वाहत जाऊन जमा होतात ते म्हणजे
   अ) कोलूव्हियम    ब) लॅक्यूस्ट्राइन    क) ॲल्यूव्हीयम    ड) टिल
   1) अ      2) अ व ब    3) क      4) ड
उत्तर :- 3

2) वरून वाहणा-या पाण्यामुळे उताराच्या जमिनीमधून समप्रमाणात पातळ थरामध्ये माती निघून जाणे याला .................... असे
     म्हणतात.
   1) ओघळपाडी धूप  2) घळई धूप    3) सालकाढी धूप    4) शिंतोडे धूप
उत्तर :- 3

3) दरवर्षी आपल्या देशात अंदाजे किती मातीची धूप होते ?
   1) 12 अब्ज टन    2) 100 अब्ज टन    3) 329 अब्ज टन    4) 120 अब्ज टन
उत्तर :- 1

4) मातीचा .................... गुणधर्म कमी करण्यासाठी ऊसाची मळी मातीमध्ये मिसळली जाते.
   1) क्षार      2) विम्ल      3) अम्ल      4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2

5) जमिनीमध्ये असणारे पर्याप्त सेंद्रीय पदार्थ किंवा ह्युमस हे जमिनीची ......................... वाढवितात.
   अ) जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता
   ब) अंतर्गलन (जमिनीत पाणी प्रवेश करण्याचा वेग/ दर)
   क) सच्छिद्रता
   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त
   3) अ आणि क फक्त    4) अ, ब आणि क
उत्तर :- 4

1 comment:

  1. Borgata Casino and Hotel | Online Sports Betting
    Borgata is owned by Atlantic City 비트 카지노 Resorts and operated 카지노딜러연봉 by Caesars Entertainment. It is owned by the casino bet365 실시간 배당 흐름 and features a restaurant, a 룰렛 배팅 bar 마닐라카지노 and a casino.

    ReplyDelete

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...