🅾दीर्घकाळ अंतराळात राहणारी महिला, असा विक्रम अमेरिकेची अंतराळवीर ख्रिस्तिना कोच हिने आपल्या नावावर केला आहे. तब्बल 328 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात वास्तव्य करून ती सुखरूपपणे पृथ्वीवर परतली आहे.
🅾 कझाकिस्तानच्या डझहेजझगन येथे गुरुवारी ख्रिस्तिना उतरली आहे. ख्रिस्तिनाने अंतराळात 328 दिवस व्यतीत करण्यासह पृथ्वीला 5,248 वेळेस प्रदक्षिणा घातल्या आहेत.
🅾 यासाठी तिने 3.9 कोटी किलोमीटरचे अंतर पार केले. हे अंतर पृथ्वी ते चंद्र यांच्यात 291 फेऱया मारण्याइतके आहे. गेल्या 11 महिन्यांत तिने 6 वेळा ‘स्पेस वॉक’ केले.
🅾 ख्रिस्तिना यांच्या मोहिमेचा मुख्य उद्देश आगामी चंद्र आणि मंगळ मोहिमांबरोबरच गुरुत्वाकर्षण आणि अंतराळातील किरणोत्सर्गाचा महिलांच्या शरीरावर पडणारा प्रभावाचा अभ्यास करणे हा होता.
🅾 चंद्रावर अंतराळ स्थानक स्थापन करण्याचे ‘नासा’चे ध्येय असून, त्यासाठी हे अध्ययन उपयुक्त ठरणार आहे.
No comments:
Post a Comment