Saturday, 15 February 2020

गगनयान मोहिमेतील चौघांचे रशियात प्रशिक्षण सुरू

🔰भारताच्या गगनयान या मानवी अवकाश मोहिमेत प्राथमिक निवड करण्यात आलेल्या चार उमेदवारांचे प्रशिक्षण रशियातील मॉस्को येथे असलेल्या गागारिन संशोधन व अवकाशवीर प्रशिक्षण केंद्रात (जीसीटीसी) सुरू झाले आहे.
भारतीय हवाई दलाच्या चार वैमानिकांची निवड यात अवकाशवारीसाठी करण्यात आली आहे.

🔰भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो ही संस्था 2022 मध्ये गगनयान मोहिमेअंतर्गत भारतीयांना अवकाशात पाठवणार आहे.
तर या मोहिमेत एकूण तीनजणांना सात दिवस अवकाशवारीची संधी मिळणार असून गगनयान मोहिमेचा खर्च 10 हजार कोटींच्या घरात आहे.

🔰पृथ्वीपासून 300-400 कि.मी.च्या कक्षेत हे अवकाशवीर यानातून फिरणार आहेत.तसेच या प्रशिक्षणासाठी ग्लावकॉसमॉस, जेएससी व इस्रोचे मानवी अवकाशमोहीम केंद्र यांच्यात करार झाला आहे. हे प्रशिक्षण बारा महिन्यांचे असून त्यात र्सवकष बाबींचा समावेश आहे. जैववैद्यकीय प्रशिक्षण यात महत्त्वाचे असून त्याबरोबरच अवकाशातील शारीरिक हालचालींचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

🔰तसेच सोयूझ या माणसाला अवकाशात घेऊन जाणाऱ्या अवकाशयानातील यंत्रणांची माहिती त्यांना करून देण्यात येईल. वजनरहित अवस्थेत राहण्यासाठी त्यांना खास विमानाने नेऊन प्रशिक्षण दिले जाणार आहे. अवकाशयानाचे अवतरण दुर्दैवाने चुकीच्या पद्धतीने झाले तर काय कृती करायची हेही संभाव्य अवकाशवीरांना शिकवले जाणार आहे.
मानवी अवकाश मोहिमेच्या प्रशिक्षणासाठी इस्रोचे मानवी अवकाशमोहीम केंद्र व ग्लावकॉसमॉस यांच्यात 27 जून 2018 रोजी करार झाला होता.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...