Saturday, 15 February 2020

नक्की वाचा खूप महत्त्वाचे आहे :- परीक्षेला जाता जाता...या गोष्टी करायला अजिबात विसरू नका


परीक्षेला जाताना होणारा गोंधळ दूर करण्यासाठी काही खास गोष्टी आणि पूर्व तयारी केली तर आपली परीक्षा केंद्रावर तारांबळ उडणार नाही.

1.पेपरच्या आधी म्हणजे आदल्या दिवशी आपली बॅग भरून तयार ठेवावी. त्यामुळे आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आयत्यावेळी विसरणार नाहीत.

2.परीक्षा केंद्रवर जाताना एकापेक्षा जास्त पेन, ब्लाक बॉलपेन, पेन्सिल, खोडरबर, पट्टी आणि आवश्यक असणारं इतर साहित्य आपलं आपण घेऊन जावं. म्हणजे कुणाकडे मागायची वेळ येणार नाही. याशिवाय 3.एकापेक्षा जास्त पेन ठेवावेत अचानक पेन फुटला किंवा लिहायचा बंद झाला तर दुसरा पर्यायी पेन असावा.

4.सोबत पाण्याची बाटली घ्या. परीक्षा केंद्रात थोड्या वेळानं घोटभर पाणी प्यावं. म्हणजे झोप येणार नाही आणि मेंदूही तल्लख राहातो.

5.रायटिंग पॅड घेणार असाल तर शक्यतो ते ट्रान्सपरंट असेल याची काळजी घ्या. अन्यथा ते सभागृहात नेण्यास परवानगी दिली जात नाही.

6.आपल्या शाळेचं आयडीकार्ड आणि हॉलतिकीट दोन्ही आपल्यासोबत ठेवा.

7.आपल्याला शाळा किंवा कॉलेज लांब आलं असेल तर आपण आपल्यासोबत असलेल्या पेपरच्या वह्या पुस्तकं घेतो. तसं करू नका. शेवटच्या क्षणी वाचून काही होत नाही आणि डोक्यात असलेलंही विसतं. त्यामुळे त्या मधल्या वेळात शांत बसून चिंतन करा.

8.परीक्षेला जाताना घरातून गोड खाऊन निघावं. त्यामुळे ऊर्जा राहाते. पोटभर खाऊन पेपरला गेल्यामुळे भुक लागत नाही किंवा भुकेनं बेचैन होत नाही. त्यामुळे पेपर सोडवण्यात व्यत्यय येत नाही.

9.परीक्षागृहात अर्धातास आधी जावं. तिथे गेल्यानंतर उत्तर पत्रिका खाडाखोड न करता भरावी आणि शांत चित्तानं बसून राहावं. आजचा पेपर मला खूप चांगला जाणार आहे आणि मला सगळं आठवणार आहे असं मनोमन चिंतावं आणि हाती पेपर आल्यावर शांतपणे वाचून सोडवायला सुरुवात करावी.

No comments:

Post a Comment