आज (6 फेब्रुवारी) महाराज सयाजीराव गायकवाड यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या विषयी सविस्तर माहिती...
नाशिक जिल्ह्यातील कवळाणे या गावी जन्मलेले गोपाळ काशिराम गायकवाड हे बडोद्याचे महाराजा खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यूनंतर बडोद्याच्या राजघराण्यात दत्तक गेले आणि ते झाले महाराजा खंडेराव गायकवाड!
सयाजीराव महाराजांनी आपल्या संस्थानात अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. पं. मदनमोहन मालवीय तर त्यांना ‘हिंदुस्थानातील एकमेव आदर्श राजा’ म्हणत.
न्यायव्यवस्थेत सुधारणा, ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन, सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय, गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण व कला शिक्षणाची सोय, हरिजनांसाठी शाळा, अस्पृश्यता निवारण.. किती किती सांगावे?
अत्यंत पुरोगामी विचारांच्या या राजाने राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले. लो. टिळक, अरविंद घोष यांच्याशी संबंध असणाऱ्या या राजाने 1886 मध्ये मुंबईत ज्योतिराव फुले यांना ‘महात्मा पदवी दिली.
सयाजीरावांनी 1882 साली हरिजनांसाठी 18 शाळा काढल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली, आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने अनेक साहित्यिक, प्रकाशक यांनी आपली कारकीर्द घडवली. केवळ साहित्यिकच नाहीत शैक्षणिक, शेती क्षेत्र, सामाजिक सुधारणा, न्याय अशा अनेक बाबतीत त्यांनी कार्य केले.
या लोकमंगल राजाचे 6 फेब्रुवारी 1939 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वडोदरा येथे निधन झाले.
No comments:
Post a Comment