Sunday, 2 February 2020

नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले रामसार स्थळ .

​​

नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात स्थित आहे. हा नांदूर मधमेश्वर जलाशयाचा परिसर आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी हजारोंच्या संख्येने आढळत असल्यामुळे ते महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. 

गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर

१९८६ मध्ये हा परिसर नांदूर मधमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आला .

इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किना-यावरील ‘ रामसर ‘ या  शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव १९७५ सालापासून अंमलात आला.

पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने दर वर्षी २ फेब्रुवारीचा दिवस ‘ वेटलँड्स डे ’ साजरा केला जावा असा निर्णय या परिषदेत घेतला गेला. असा पहिला दिवस १९९७ साली साजरा झाला.

भारतातील एकूण 27 प्रदेशांचा या यादीत समावेश होता . नुकतेच आणखी 10 स्थळांचा समावेश रामसार  यादीत करण्याची घोषणा पर्यावरण मंत्र्यांकडून करण्यात आली आहे . त्यामुळे ही संख्या 37 होईल .

  सुंदरबन हे सर्वांत मोठे, तर रेणुका (हिमाचल प्रदेश) हे सर्वांत लहान आकाराचे क्षेत्र आहे. (जुन्या  यादी प्रमाणे)

No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...