जागतिक बँकेनी आपला वार्षिक 'डूइंग बिझनेस 2019' अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘व्यवसाय सुलभता’ (ease of doing business) निर्देशांकामध्ये भारताला जगभरातल्या 190 देशांमध्ये 77 हा क्रमांक मिळाला आहे.
अन्य बाबी
व्यवसाय सुलभता’ निर्देशांकामध्ये न्यूझीलँड शीर्ष स्थानी आहे.
सोमालिया हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात अयोग्य जागा ठरीत आहे.
गेल्या वर्षी या निर्देशांकामध्ये भारताचा 100 वा क्रमांक होता. भारताने 10 पैकी आठ घटकांमध्ये सुधारणा दिसून आली.
व्यवसाय सुरू करण्यात सुलभता, बांधकाम परवाना, वीज मिळविणे, आर्थिक पत मिळवणे, कर भरणे, सीमेवरील व्यापार करणे, कंत्राट अंमलात आणणे आणि तंटा सोडवणे अश्या घटकांचा अभ्यास केला गेला आहे.
No comments:
Post a Comment