Thursday, 27 February 2020

जागतिक लोकशाही निदेशांकात भारत 51 व्या स्थानी

📚भारतातील लोकशाहीचा डंका जगात वाजत असतो. संपूर्ण लोकशाही पद्धत अमलात आणणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जात असले, तरी लोकशाही निर्देशांकात भारताचे स्थान घसरले आहे. या यादीत भारताचा क्रमांक 51 वा आहे. गेल्या वेळेपेक्षा भारत दहा पायऱ्या खाली उतरला आहे.

📚जागतिक लोकशाही निर्देशांकात 2019 मध्ये भारताचा गुणांक 6.9 होता, जो 13 वर्षांतील सर्वांत नीचांकी पातळीवर आहे. लोकशाही निर्देशांक अहवालानुसार जम्मू-काश्‍मीरमधून 370 वे कलम हटविणे आणि सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्यामुळे भारताच्या लोकशाही निर्देशांकाचा गुणांक खालावला आहे.

असा ठरतो लोकशाही निर्देशांक

📚"द इकॉनॉमिस्ट'ने 2006 मध्ये हा निर्देशांक जाहीर करण्यास सुरवात केली. तेव्हापासून आतापर्यंत 13 वर्षांतील हा भारताचा सर्वांत कमी निर्देशांक आहे.

📚2014 मध्ये सर्वांत जास्त निर्देशांक 7.92 होता. निवडणूक प्रक्रिया आणि बहुसंख्याकांची स्थिती, सरकारी कार्यप्रणाली, राजनैतिक भागीदारी, राजकीय संस्कृती आणि सामाजिक स्वातंत्र्य या पाच मुद्यांवर लोकशाही निर्देशांक निश्‍चित केला जातो.

📚लोकशाही निर्देशांकासाठी वरील मुद्दे लक्षात घेता 2019 हे वर्ष भारतासाठी उलथापालथीचे ठरले. केंद्रातील भाजप सरकारने काश्‍मीरमधून 370 वे कलम हटविले.

📚सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) लागू केला. सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयांमुळे राजकारणात मोठे पडसाद उमटले. "सीएए'मुळे सपूर्ण देशात भेदभाव निर्माण केला गेला, अशा भावना व्यक्त झाल्या. या सर्वाचा परिणाम 2019 मध्ये भारतात सामाजिक स्वातंत्र्य आणि लोकशाही व्यवस्थेवर झाला, असे नमूद करण्यात आले आहे.

तेरा वर्षांत भारताच्या लोकशाही निर्देशांकातील घट :-

•2006 : 7.68
•2008 : 7.8
•2010 : 7.28
•2011 : 7.3
•2012 : 7.52
•2013 : 7.69
•2014 : 7.92
•2015 : 7.74
•2016 : 7.81
•2017 : 7.23
•2018 : 7.23
•2019 : 6.9

निर्देशांकातील पहिले पाच देश आणि गुणांक :-

•9.87 नॉर्वे (प्रथम)

•9.58 आइसलॅंड (द्वितीय)

•9.38 स्वीडन (तृतीय)

•9.26 न्यूझीलंड (चौथा)

•9.25 फिनलंड (पाचवा)

तळातील पाच देशांचे गुणांक कंसात यादीतील क्रमांक :
•1.61 चाड (163)

•1.43 सीरिया (164)

•1.32 मध्य आफ्रिका प्रजासत्ताक (165)

•1.13 लोकशाही प्रजासत्ताक कांगो (166)

•1.08 उत्तर कोरिया (168)

भारताचा लोकशाही निर्देशांक :-

•7.68- 2006 (यूपीए सरकार सत्तेवर)
•7.92 - 2014 (भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार)
•6.9 - 2019 (भाजप सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर)

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...