Tuesday, 11 February 2020

23 व्या ई -गव्हर्नन्स परिषदेचा मुंबईत समारोप

📌ई-गव्हर्नन्स ही देशाच्या भविष्यातील प्रगतीची गुरुकिल्ली - केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह.

📌मुंबई घोषणेतील दहा तरतुदीद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून विशेषत: आरोग्य, शेती, शिक्षण आणि भूमी सार्वजनिक सेवा सुधारण्याचे ध्येय्य

📌मुंबईला भारताची फिनटेक राजधानी म्हणून विकसित करु; मार्च 2020 मध्ये मुंबईत इंडिया फिन्टेक महोत्सवाचे आयोजनही करु: महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान मंत्री सतेज पाटील.

📌देशाच्या सुप्रशासनासाठी ई-गव्हर्नन्स हा महत्त्वाचा भाग असून तळागाळातील व्यक्तींपर्यंत शासनाच्या सेवा सुविधा तसेच योजनांचा लाभ पोहोचवणे ही खरी या प्रकल्पाची लिटमस टेस्ट आहे.

📌त्यामुळे भारताच्या विकास प्रवासात ई-गव्हर्नन्स ही भविष्यातील गुरुकिल्ली ठरेल असे प्रतिपादन केंद्रीय ईशान्य क्षेत्र
विकास, वैयक्तिक, जन तक्रार आणि निवृत्तीवेतन, अणुऊर्जा व अवकाश विभाग तसेच पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी केले. 

📌23 व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचा समारोप आणि आणि ई गव्हर्नन्स तसेच हॅकेथोन  पारितोषिक प्रदान समारंभ आज मुंबईत एन.एस. सी. आय. डोम वरळी येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

📌केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सिंह पुढे म्हणाले, ई-गव्हर्नन्स ही देशाच्या भविष्यातील प्रगतीची गुरुकिल्ली आहे. ई राष्ट्रीय कृषी बाजार किंवा आयुष्मान भारत अशा योजनांसाठी व उत्तम प्रशासनासाठी ई-गव्हर्नन्स आवश्यक आहे.

📌हाती घेतलेल्या प्रकल्पाचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आहे की नाही, यावरून प्रकल्पाचे यशापयश ठरते. 

📌युवकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करून त्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

📌केंद्रीय राज्यमंत्री पुढे म्हणाले, शासनाच्या विविध योजना गरीबांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून गरिबांसाठी समर्पित असलेले सरकार ही आपली ओळख सरकारने प्रस्थापित केली आहे.

📌किमान शासन, कमाल प्रशासन ह्या शासनाच्या ध्येयाशी अशा परिषदा सुसंगतच असल्याचे त्यांनी सांगितले.

📌 भारतीय फिन टेक महोत्सव मार्च 2020 मध्ये मुंबईत भरविण्यासाठी केंद्र सरकार राज्य शासनाला संपूर्ण पाठबळ पुरवेल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...