Wednesday, 19 February 2020

जानेवारी 2020 चा घाऊक किंमत निर्देशांक.


 
सर्व वस्तूंसाठीच्या घाऊक किंमत निर्देशांकात जानेवारी 2020 मध्ये आधीच्या महिन्याच्या तुलनेत 0.1 टक्के वाढ होऊन तो 122.8 वरून 122.9 (तात्पुरती आकडेवारी)वर पोहोचला.

चलनफुगवटा....

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा वार्षिक दर जानेवारी 2020 मध्ये 3.1 टक्के राहिला. आधीच्या महिन्यात तो 2.59 टक्के(तात्पुरती आकडेवारी)  आणि जानेवारी 2019 मध्ये तो 2.76 टक्के होता.

प्राथमिक वस्तू...

या गटाच्या निर्देशांकात 1.1 टक्क्याने घसरण होऊन तो 147.2 (तात्पुरती आकडेवारी) झाला. त्या आधीच्या महिन्यात तो 148.8 होता.

अन्न घटकाच्या निर्देशांकात आधीच्या महिन्याच्या तुलनेत 1 टक्क्याने घसरण होऊन तो 160.8 झाला.

‘खाद्येतर’ घटकाच्या निर्देशांकात 1.4 टक्के घसरण होऊन तो 132.1 पर्यंत खाली आला.

‘खनिजे’ घटकाच्या निर्देशांक 7.2 टक्के घट होऊन तो 142.6 झाला.

‘कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू’ घटकाच्या निर्देशांकात 2.7 टक्के वाढ हाऊन तो आधीच्या महिन्याच्या 88.3 झाला.

इंधन आणि वीज

या गटाच्या निर्देशांकात 1.4 टक्के वाढ होऊन तो 102.7 राहिला.

उत्पादित वस्तू
या गटाच्या निर्देशांकात 0.4 टक्के वाढ होऊन ते 118.5 झाला.

अन्नधान्य आधारित घाऊक किंमत निर्देशांक..

अन्नधान्य आधारित घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर घसरून जानेवारी 2020 मध्ये तो 10.12 टक्के झाला. डिसेंबर 2019 मध्ये तो 11.05 टक्के होता.

No comments:

Post a Comment