Saturday, 29 February 2020

विश्वकर्मा पुरस्कार 2019

- 24 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ ह्यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘विश्वकर्मा पुरस्कार 2019’ यांचे वाटप करण्यात आले.
- हे पुरस्कार दोन श्रेणींमध्ये देण्यात आले आहे – छात्र विश्वकर्मा पुरस्कार आणि उत्कृष्ट संस्थान विश्वकर्मा पुरस्कार.

▪️ठळक बाबी

- विविध गटात एकूण 23 चमूला छात्र विश्वकर्मा पुरस्कार देण्यात आले आहेत. तर सहा संस्थांना उत्कृष्ठ संस्थान विश्वकर्मा पुरस्कार देण्यात आला.
याव्यतिरिक्त, प्रत्येक उपश्रेणीतल्या पहिल्या तीन चमुला प्रशंसा प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस (51000, 31000 आणि 21000 रुपये) प्रदान करण्यात आले.
- पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला.

▪️ पुरस्काराविषयी

- अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) वर्ष 2017 पासून विश्वकर्मा पुरस्कार स्पर्धांचे आयोजन करीत आहे. मान्यताप्राप्त संस्थांच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कल्पक भावना आणि वैज्ञानिक गुण वाढविण्यासाठी या पुरस्काराची स्थापना केली गेली आहे.

▪️ AICTE: तंत्रशिक्षण क्षेत्रातल्या सुविधांचे सर्वेक्षण करण्यासाठी आणि देशातल्या तांत्रिक शिक्षणाच्या समन्वित व समाकलित विकासासाठी राष्ट्रीय पातळीवरची सर्वोच्च सल्लागार संस्था म्हणून 1945 साली अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) याची स्थापना केली गेली. मुख्यालय नवी दिल्लीत आहे. ही संस्था मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेली एक वैधानिक संस्था आणि तांत्रिक शिक्षणासाठी एक राष्ट्रीय परिषद आहे.

No comments:

Post a Comment