Wednesday, 19 February 2020

2018-19 या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा:-

📚शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या 2018-19 या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली (State sports awards) आहे.

📚यात कुस्तीमहर्षी पंढरीनाथ तथा आण्णासाहेब पठारे यांना शिवछत्रपती जीवन गौरव राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे.

📚तर 5 जणांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.यात-

•युवराज खटके, सांगली (अॅथलेटिक्स)
• बाळासाहेब आवारे, बीड (कुस्ती)
• नितीन खत्री, पुणे (तायक्योंदो)
•जगदीश नानजकर, पुणे (खो-खो)
•अनिल बंडू पोवार, कोल्हापूर (पॅरा अॅथलेटिक्स) यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार दिला जाणार आहे.

📚तर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची (खेळाडू गट) यादी जाहीर करण्यात आली आहे. यात कबड्डी खेळात पुरुष गटातून रिशांक देवाडिगा आणि गिरीष इरनक तर महिला गटातून सोनाली शिंगटे हिला पुरस्कार जाहीर झाला आहे.

📚 कुस्ती खेळासाठी राज्य क्रीडा पुरस्कार अभिजित कटके याला दिला जाणार (State sports awards) आहे.

📚त्याशिवाय साहसी गटात चौघांना राज्य क्रीडा पुरस्कार मिळणार आहे. यात खाडी पोहणे यासाठी प्रभात कोळी आणि शुभम वनमाली यांना पुरस्कार दिला जाणार आहे.

📚तर गिर्यारोहणासाठी अपर्णा प्रभूदेसाई आणि सागर बडवे यांना राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

📚तर स्वप्निल पाटील (जलतरण), पार्थ हेंद्रे (जलतरण), सायली पोहरे (जलतरण) या तिघांना दिव्यांग खेळाडू गटातील राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. तर जयदीपकुमार सिंह याला ज्युदो आणि वैष्णवी सुतार हिला टेबल टेनिस खेळासाठी पुरस्कार दिला जाणार (State sports awards) आहे

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...