प्रश्न : पश्चिमेकडून पूर्वेकडे जातांना महाराष्ट्रात क्रमाने येणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा?
पर्याय :
1. नाशिक - जालना - औरंगाबाद - परभणी
2. औरंगाबाद - नाशिक - जालना - परभणी
3. नाशिक - औरंगाबाद - जालना - परभणी
4. नाशिक - औरंगाबाद
उत्तर :
3. नाशिक - औरंगाबाद - जालना - परभणी
प्रश्न : पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व ……. यांच्यात झाली.
पर्याय :
1. मुघल
2. शिख
3. मराठे
4. राजपूत
उत्तर :
3. मराठे
प्रश्न : महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही?
पर्याय :
1. नागपूर
2. पुणे
3. यापैकी नाही
4. औरंगाबाद
उत्तर :
2. पुणे
प्रश्न : ‘उंटावरचा शहाणा’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
पर्याय :
1. खूप हुशार माणूस
2. खुशामती माणूस
3. मूर्खपणाचा सल्ला देणारा
4. मूर्ख माणुस
उत्तर :
3. मूर्खपणाचा सल्ला देणारा
प्रश्न : महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही?
पर्याय :
1. आंध्रप्रदेश
2. यापैकी नाही
3. छत्तीसगड
4. मध्यप्रदेश
उत्तर :
1. आंध्रप्रदेश
प्रश्न : देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ कोणते?
पर्याय :
1. कोल्हापूर
2. माहूर
3. तुळजापूर
4. वणी (नाशिक)
उत्तर :
4. वणी (नाशिक)
प्रश्न : ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय?
पर्याय :
1. किसन बाबुराव हजारे
2. किसन कृष्णा हजारे
3. कृष्णा बापूराव हजारे
4. आण्णा कृष्णा हजारे
उत्तर :
1. किसन बाबुराव हजारे
प्रश्न : धुळे जिल्ह्यातून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?
पर्याय :
1. रा.म. 6
2. रा.म. 50
3. रा.म. 9
4. रा.म.8
उत्तर :
1. रा.म. 6
(प्रश्न : खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही?
पर्याय :
1. रसायनशास्त्र
2. कला
3. साहित्य
4. शांतता
उत्तर :
2. कला
प्रश्न : स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम …… या देशाने बहाल केला.
पर्याय :
1. न्युझिलंड
2. अमेरिका
3. भारत
4. इंग्लंड
उत्तर :
1. न्युझिलंड
प्रश्न : महाराष्ट्र : पुरणपोळी :: बंगाल : ?
पर्याय :
1. बासुंदी
2. बर्फी
3. श्रीखंड
4. रसगुल्ला
उत्तर :
4. रसगुल्ला
प्रश्न : ‘केसाने गळा कापणे’ या म्हणीचा अर्थ सांगा.
पर्याय :
1. दमबाजी करणे
2. शत्रुत्व निर्माण करणे
3. विश्वासघात करणे
4. ठार मारणे
उत्तर :
3. विश्वासघात करणे
No comments:
Post a Comment