Wednesday, 26 February 2020

1 मार्चपासून या देशात सार्वजनिक वाहतूक सर्वांसाठी मोफत

🔰दिल्लीमध्ये महिलांसाठी सार्वजनिक बसमधून प्रवास करणे मोफत आहे, हे सर्वांनाच माहिती आहे.

🔰मात्र 1 मार्चपासून एका देशातील सर्व नागरिकांसाठी रेल्वे अथवा बसमधून प्रवास करणे मोफत केले जाणार आहे.

🔰या देशाचे नाव लग्झमबर्ग असून, अशी सुविधा देणारा हा पहिलाच देश आहे.

🔰लग्झमबर्ग हा यूरोपमधील सातवा सर्वात लहान, मात्र श्रींमत देश आहे.

🔰येथे 1 मार्चपासून
👉रेल्वे,
👉ट्राम आणि
👉बसमधून प्रवास करण्यासाठी पैसे घेतले जाणार नाहीत.

🔰देशातील नागरिकांसाठी परिवहनाची सर्व सुविधा मोफत असतील.

🔰केवळ देशातील नागरिकांसाठीच नाही तर परदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी देखील ही सेवा मोफत असेल.

🔰वर्ष 2018 मध्ये जेव्हियर बेटल यांनी लग्झमबर्गचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.

🔰त्याआधी निवडणूक प्रचारात त्यांनी सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याची घोषणा केली होती.

🔰या निर्णयामुळे जवळपास 6 लाख नागरिक, 1,75,000 हजार परदेशी मजूर आणि येथे दरवर्षी येणाऱ्या 12 लाख पर्यटकांना फायदा होईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...