Saturday, 18 January 2020

मायकेल पात्रा: RBI चे नवे डेप्युटी गव्हर्नर

🔆भारतीय रिझर्व्ह बँकेनी डॉ. मायकेल पात्रा ह्यांची नवे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या पतधोरण समितीचे सदस्य असलेले पात्रा विरल आचार्य यांची जागा घेणार आहेत.

🔆विद्यमान डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य ह्यांनी राजीनामा दिला असून 23 जुलै 2020 रोजी आचार्य ह्यांच्या जागी मायकेल पात्रा पदभार स्वीकारणार आहेत. ते पुढील तीन वर्षे डेप्युटी गव्हर्नरपदी राहणार. भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध विभागात 35 वर्षांचा पात्रा यांना अनुभव आहे.

💢डॉ. मायकेल पात्रा...

🔆IIT मुंबईमधून अर्थशास्त्रात पीएचडी केलेले डॉ. पात्रा हे 2005 सालापासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विभागात काम करीत आहेत. 1985 साली ते भारतीय रिझर्व्ह बँकेत रुजू झाले. त्यांनी हावर्ड विद्यापीठात आर्थिक स्थैर्य या विषयावर संशोधनात्मक लिखाण केले. आंतररराष्ट्रीय पातळीवरील वित्त, पैसा आणि धोरणे याविषयी आर्थिक विश्लेषण आणि धोरणे विभागाचे ते सल्लागार राहिले आहेत.

💢RBI विषयी...

🔆भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते.

🔆‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्याचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे.

🔆RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार डेप्युटी गव्हर्नर नियुक्त केले जातात. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी॰ डी॰ देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...