🏦रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी एक नवे मोबाइल अप्लिकेशन लाँच केले आहे. दृष्टीहिनांसाठी हे अॅप विकसित करण्यात आले आहे. याद्वारे दृष्टीहिनांना चलनी नोटा ओळखण्यास मदत होणार आहे.
💁♂मोबाइल एडेड नोट आयडेंटिफायर (MANI) असं या अॅपचं नाव आहे. हे आरबीआय अॅप अँड्रॉइड प्लेस्टोअर किंवा iOS अॅप स्टोअर वरून मोफत डाऊनलोड करता येईल. एका अधिकाऱ्याने माहिती दिली की हे नवे अॅप्लिकेशन दृष्टीहिनांसाठी आहे.
▪याद्वारे त्यांना महात्मा गांधी सिरीज आणि नवी महात्मा गांधी सिरीजच्या भारतीय बँक नोटा ओळखता येणार आहेत. नोटेचं छायाचित्र घेतलं आणि मोबाइलच्या रिअर कॅमेऱ्यासमोर धरलं तर अॅप ती नोट वाचून दाखवतो.
📍अॅपमध्ये भाषा बदलण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. व्हॉइस कमांड्स, इम्पेअरमेंट बदल, कॅमेऱ्याद्वारे चलन ओळखणे असे अनेक पर्याय आहेत. ओळखलेल्या चलनाची हिस्ट्री ३० दिवसपर्यंत कॅमेऱ्यात राहते.
No comments:
Post a Comment