Sunday, 5 January 2020

निवडणूक आयोगाची नवी यंत्रणा: “पॉलिटिकल स रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टम (PPRTMS)”

- अर्जदारांना अर्जांची स्थिती जाणून घेता यावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) “पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टम (PPRTMS)” नावाची नवी यंत्रणा कार्यरत केली आहे.

- 1 जानेवारी 2020 पासून याबाबतचे नवीन नियम लागू झाले. त्याच्या अंतर्गत, 1 जानेवारीपासून राजकीय निवडणूक पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज करणारे अर्जदार विनंतीची प्रगती मागू शकतात आणि SMS व ई-मेलद्वारे स्थिती प्राप्त करू शकण्यास सक्षम झाले आहेत.

▪️नव्या नियमांनुसार,

- नोंदणी करणार्‍या संघटनेच्या स्थापनेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत आयोगाकडे अर्ज सादर करावा लागणार.

- https://pprtms.eci.gov.in या संकेतस्थळावर अर्जाची स्थिती जाणून घेता येणार आहे.

- राज्यघटनेतले कलम 324 आणि ‘लोकप्रतिनिधी कायदा-1951’ याच्या कलम 29 (अ) अन्वये राजकीय पक्षांची नोंदणी प्रकिया नियंत्रित केली जाते.

▪️ECI विषयी

- भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व अर्ध-न्यायिक संस्था आहे. आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी झाली.

- घटनेच्या कलम 324 अन्वये आयोगावर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती तसेच संसदेची लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते.

- आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत.
---------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...