🌺नवी दिल्लीत ‘NIC तंत्रज्ञान परिषद–2020’ (Tech Conclave) आयोजित करण्यात आली. 21 जानेवारी 2020 रोजी या दोन दिवस चालणार्या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते झाले.
🌺राष्ट्रीय माहिती शास्त्र केंद्र (NIC) या संस्थेच्या वतीने ‘टेक्नॉलॉजीज फॉर नेक्स्ट-जेन गव्हर्नन्स’ या विषयाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
🌺या कार्यक्रमाची देशभरातल्या सरकारी अधिकार्यांच्या क्षमता वाढीस मदत होणार आणि उच्च दर्जाची नागरिक-केंद्रित सेवा देण्यास मदत होणार आहे.
⭐️NIC विषयी..
🌺राष्ट्रीय माहिती शास्त्र केंद्र (National Informatics Centre -NIC) हे भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत एक संलग्न कार्यालय आहे. या संस्थेची स्थापना 1976 साली झाली. हे केंद्र सरकारी IT सेवांच्या वितरणासाठी आणि डिजिटल इंडियाच्या काही उपक्रमांच्या वितरणास मदत करण्यासाठी पायाभूत सुविधा पुरवते.
No comments:
Post a Comment