महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या 240 जागांसाठी 15 मार्च 2020 रोजी पूर्व परीक्षा मुंबई, नागपूर, पुणे व औरंगाबाद येथील केंद्रांवर घेण्यात येणार आहे.या परीक्षेसाठीची अर्हता, अभ्यासक्रम, महत्वाची संदर्भ पुस्तके यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
⏰एकूण पदे :-240
🎓शैक्षणिक पात्रता :- डिप्लोमा/ डिग्री इंजिनिअरिंग
👍अधिक माहितीसाठी पहा :- mpsc.gov.in
💻पूर्व परीक्षा :- 15 मार्च 2020
💵फी- मागासवर्गीय 274
ओपन 374
माजी सैनिक 24
💐ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 फेब्रूवारी 2020
MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा अभ्यासक्रम व महत्वाचे संदर्भ
MPSC ने सदर पदासाठीचा अभ्यासक्रमात 3 घटक अंतर्भूत केले आहेत.परीक्षेत 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी असून परीक्षेचा कालावधी 1 तासांचा आहे.
घटक 1: सामान्य अध्ययन (50 प्रश्न)
यावर 50 प्रश्न विचारले जात असून अभ्यासक्रमात सामाजिक व औद्योगिक सुधारणा,सामान्य विज्ञान,भारताचा सामान्य इतिहास व भूगोल(विशेष संदर्भ महाराष्ट्र), नागरिकशास्त्र(राज्यव्यवस्था) व चालू घडामोडी या विषयांचा समावेश आहे.या घटकांच्या तयारीसाठी पुढील पुस्तके अभ्यासणे महत्वाचे आहे.
1.PSI, STI, ASO पूर्व परीक्षा के'सागर सरांचा ठोकळा(83 वी आवृत्ती)- या पुस्तकात सामान्यज्ञान घटकांची माहिती अतिशय नेमकेपणाने व परिक्षभिमुख पद्धतीने मांडली आहे. तसेच अलीकडील चालू घडामोडी, नागरिकत्व अधिनियम याचीही माहिती यात समाविष्ट आहे.प्रत्येक घटकावर महितीनंतर भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्न दिले आहे.
2.समाजसुधारक - के'सागर/प्राचार्य डॉ.गाठाळ/डॉ.अनिल कठारे
3.औद्योगिक सुधारणेसाठी अर्थव्यवस्थेवरील डॉ.किरण देसले/ नागेश गायकवाड/रंजन कोलंबे यांचे पुस्तक अभ्यासावे.
4.इतिहास व भूगोल साठी 6 ते 11 वी पाठ्यपुस्तके तसेच खतीब/ सवदि यांची पुस्तके अभ्यासा.
5.राज्यव्यवस्थेसाठी - विनायक घायाळ/रंजन कोळंबे/लक्ष्मीकांत अभ्यासावे.
6.सामान्य विज्ञान - अनिल कोलते/चंद्रकांत गोरे/डॉ.सचिन भस्के
7.चालू घडामोडी साठी इद्रिस पठाण/ राजेश भराटे/ डॉ.सुशील बारी/ बालाजी सुरणे/परिक्रमा मासिक यांची चालू घडामोडी व वार्षिकी पुस्तके वापरावीत.
घटक 2: यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी व त्यासंबंधित चालू घडामोडी (20 गुण)
1.MPSC AMVI Mechanical & automobile engineering - Shubhangi Tambvekar, K'Sagar Publications
2.MPSC AMVI मोटार वाहन चालविण्याचे आणि वाहतुकीबाबतचे कायदे व नियम - डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स ( या पुस्तकातून सोप्या भाषेत मोटार वाहन तांत्रिक माहिती तसेच मोटार वाहन कायदा 1988 व अलीकडील मोटार वाहन (दुरुस्ती) कायदा 2019 ची माहिती मिळेल, ते परीक्षेतील तांत्रिक चालू घडामोडीसाठी उपयुक्त ठरेल.)
3.तसेच Mechanical & automobile engineering घटकांशी सम्बधित डिप्लोमा व पदवीच्या विषयाचा अभ्यास करावा.तसेच सी.चांद प्रकाशनची या घटकांशी सम्बधित वस्तुनिष्ठ पुस्तके अभ्यासावीत.
घटक 3: बुद्धिमापन चाचणी(30 प्रश्न)
बुद्धिमापन चाचणीसाठी फिरोज पठाण/के'सागर/अनिल अंकलगी/आर.एस.अग्रवाल यांची पुस्तके अभ्यासावीत.
No comments:
Post a Comment