Monday, 20 January 2020

स्वदेशी निर्मित K-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

📌चीनची राजधानी बीजिंग पासून पाकिस्तानचे सर्व शहरांना आपल्या कवेत घेण्याची क्षमता असलेली स्वदेशी निर्मित के-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आज भारताकडून करण्यात आली.

📌गेल्या दोन वर्षापासून यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. जवळपास ३५०० किलोमीटर दूर पर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र असून ते शस्त्र घेऊन जाण्यात सक्षम आहे.

📌सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, के-४ क्षेपणास्त्र पाणबुडीची चाचणी रविवारी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर करण्यात आली. समुद्राच्या पाण्यातून ही यशस्वी चाचणी करण्यात आली.

📌स्वदेशात विकसित करण्यात आलेल्या दोन क्षेपणास्त्रांपैकी ही एक आहे. के-४ शिवाय दुसरे क्षेपणास्त्र बिओ-५ आहे. याची डागण्याची क्षमता जवळपास ७०० किलोमीटर आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओने विकसित केले आहे.

📌देशात बनवलेली अरिहंत क्लासची परमाणू पाणबुडीला तैनात करण्यात येणार आहे. भारताकडे आयएनएस अरिहंत परमाणू पानबुडी आहे. तर अन्य एका पानबुडीचा समावेश करण्यात येणार आहे.

📌 जमीन, हवा आणि पाण्यातून परमाणू क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता ठेवणारा भारत जगातील सहावा देश ठरला आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन या देशांसह भारताचा यात समावेश झाला आहे.

🔴K-4 ची वैशिष्ट्ये

📌३५०० किलोमीटर पर्यंत मारा करू शकते .

📌१२ मीटर क्षेपणास्त्राची लांबी आहे.

📌१.३ मीटर गोल आकार आहे.

📌तब्बल १७ टन वजन आहे.

📌२००० किलोचे शस्त्र घेऊन जाण्याची क्षमता.

📌२० मीटर खोल पाण्यात हल्ला करण्याची क्षमता.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...