👉अंतराळवीरांना मोहिमेसाठी सज्ज करण्याच्या हेतूने त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कर्नाटक राज्यातल्या छल्लाकेरे या गावाजवळ जागतिक दर्जाची सुविधा देणार एक प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे.
👉कर्नाटकातल्या चित्रदुर्गा जिल्ह्यात बेंगळुरू-पुणे NH4 वरील छल्लाकेरे या गावाजवळ हे केंद्र उभारले जाणार आहे. हा प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण केला जाणार आहे.
👉ISROने या प्रकल्पासाठी 2,700 कोटी रुपयांचा एक आराखडा तयार केला आहे.
👉या केंद्रामध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तसेच तेथे ‘योंग ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर’ देखील तयार केले जाणार.
👉सध्या, गगनयान अभियानासाठी भारतीय अंतराळवीरांना रशियामध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.
✅ISRO विषयी
👉भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे आणि त्याचे बेंगळुरू येथे मुख्यालय आहे.
👉1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापना झालेल्या ISRO या संस्थेनी 1962 साली स्थापना झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) या संस्थेची जागा घेतली. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते.
👉ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केला. 1980 साली, भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पाहिल्यादा प्रक्षेपित करण्यात आला.
👉22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली. त्यानंतर ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.
No comments:
Post a Comment