● भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीसॅट-३० (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्वेकडील कैरो बेटावरून करण्यात आले. या नव्या आणि आधुनिक उपग्रहामुळे येणाऱ्या काळात इंटरनेटचा स्पीड अधिक गतीने वाढणार आहे.
● जीसॅट-३० हा एक दूरसंचार उपग्रह आहे. हा उपग्रह इनसॅट-४एच्या जागी काम करेल. इनसॅट-४ या उपग्रहाची मर्यादाही संपुष्टात येत असून तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे अधिक शक्तिशाली आणि आधुनिक उपग्रहाची आवश्यकता होती. त्यामुळेच इस्रोने जीसॅट-३०चं यशस्वी उड्डाण केलं आहे.
● GSAT-30चं वजन सुमारे ३१०० किलो असून लॉन्चिंगपासून १५ वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे.
● या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं आहे. यात दोन सोलर पॅनल आणि बॅटरी असून त्यामुळे ऊर्जा मिळणार आहे. यापूर्वी इनसॅट-४ए हा उपग्रह २००५मध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्यामुळे आता हा नवा उपग्रह लॉन्च करण्यात आला असून त्यामुळे भारतातील दूरसंचार सेवेत सुधारणा होणार आहेत. त्यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. विशेष म्हणजे मोबाइल सेवा ज्या क्षेत्रात अद्याप पोहचू शकलेल्या नाहीत, त्या क्षेत्रात या नव्या उपग्रहामुळे मोबाइल सेवा पोहचू शकणार आहेत. या व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेव्हिजन सेवा आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. त्याशिवाय जलवायूमध्ये होणारे बदल आणि हवामानाचं भाकित वर्तवण्यासाठीह या उपग्रहाची मदत होणार आहे.
● 2020 मध्ये भारताकडून एकूण १० उपग्रह लॉन्च करण्यात येणार आहेत. यात आदित्य-एल१ उपग्रहाचाही समावेश आहे. या उपग्रहाला २०२०पर्यंत लॉन्च केलं जाईल. मिशन सूर्याचा अभ्यास करणारा हा पहिला भारतीय उपग्रह असेल. इस्रोने गेल्या वर्षी ६ लॉन्च वाहन आणि ७ सॅटेलाइट लॉन्च केले होते.
Thursday, 16 January 2020
GSAT-30 या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण:-
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
BIS Recruitment 2024
BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...
-
१】"खसखस पिकणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ? ~मोठ्याने हसणे . २】"गंगेत घोडे न्हाने "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
◾️ स्पष्ट दिसणारे केंद्रक व पेशीअंगके नसतात त्यांना आदिकेंद्रकी पेशी असते म्हणतात ◾️ आदिकेंद्रकी पेशी आकाराने खूप लहान असतात ◾️या पेशीतील क...
No comments:
Post a Comment