Wednesday, 1 January 2020

जनरल बिपिन रावत: भारताचे प्रथम संरक्षण दल प्रमुख (CDS)

- भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख (Chief of Defence Staff -CDS) म्हणून भुदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांची नियुक्ती झाली आहे. ते 1 जानेवारी 2020 रोजी पदभार स्वीकारतील. तर लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरावणे यांनी भारतीय भुदलाच्या प्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे.

- लष्करासंबंधी मुद्द्यांवर संरक्षण दल प्रमुख (CDS) हे सरकारचे सल्लागार असणार तसेच भुदल, हवाईदल आणि नौदल यांच्यात अधिक चांगला समन्वय राहण्यावर भर देणार आहेत.

▪️संरक्षण दल प्रमुख (CDS) पद

- भारत सरकारने 4-स्टार जनरलच्या हुद्यामध्ये संरक्षण दल प्रमुख (CDS) पद स्थापन केले. CDSला इतर सेना प्रमुखांप्रमाणेच वेतन आणि सुविधा दिल्या जाणार.

- ते लष्कर व्यवहार विभागाचे (किंवा सैनिकी व्यवहार विभाग) प्रमुख असणार. हा विभाग संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत तयार केला जाणार आहे.

- संरक्षण मंत्रालयाने भुदल, हवाईदल आणि नौदला यांच्यासंदर्भातल्या नियमांमध्ये दुरुस्ती करत त्यात CDS वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत सेवेत राहू शकणार, अशी तरतूद केली आहे.

- CDS हे सशस्त्र दलांच्या कर्मचारी समितीचे अध्यक्ष असणार. तिन्ही दलांच्या सर्व मुद्द्यांवर संरक्षण मंत्रालयाचे प्रमुख लष्करी सल्लागार म्हणून ते काम करणार.

- तिन्ही दलांचे प्रमुखही आपापल्या विभागांशी संबंधित मुद्द्यांवर संरक्षण मंत्रालयाला सल्ला देणार.

- तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांबरोबर CDS कोणत्याही दलाचे प्रमुखपद सांभाळणार नाहीत. CDS तिन्ही दल प्रमुखांसह कोणत्याही लष्करी कमांडचा उपयोग करणार नाही, जेणेकरून राजकीय नेतृत्वाला नि:पक्षपाती सल्ला देण्यात सक्षम होतील.

- वायफळ खर्च कमी करून, सशस्त्र दलांची युद्धक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने CDS तिन्ही दलांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार.

- अण्वस्त्र अधिकारातून अण्वस्त्राची कळ दाबण्याबाबत ते पंतप्रधानांचे मुख्य लष्करी सल्लागार राहतील. 2003 साली स्थापना झालेल्या अण्वस्त्र अधिकार प्राधिकरण (NCA) यामध्ये 16 वर्षांनंतर हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

▪️पार्श्वभूमी

- तिन्ही सशस्त्र दलांमध्ये तीनही दलांमध्ये सामंजस्य राखता यावे या विचाराने संरक्षण दल प्रमुख हे पद निर्माण करण्यात आले.

- कारगिल युद्धानंतर CDS पद बनवण्याची शिफारस झाली होती. यामागे तीन प्रमुख उद्देश आहेत;

- प्रशिक्षण, खरेदी, कर्मचारी आणि मोहिमांना योग्य दिशा देणे.

- राजकीय नेतृत्वाच्या लष्करी सल्ल्याचा दर्जा सुधारणे.

▪️लष्करी बाबीत वैविध्य आणणे.

- हे पद तीनही सशस्त्र दलांच्या प्रमुखांपेक्षा वरचे आहे. सन 1999 च्या कारगिल युद्धानंतर तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या गटाने देखील CDSला तिन्ही दलांमध्ये चांगले समन्वय स्थापित करण्याची शिफारस केली होती.

- अमेरिका, चीन, ब्रिटन, जापानसह जगातल्या बर्‍याच देशांमध्ये चीफ ऑफ डिफेन्स सारखी व्यवस्था आहे.

- लष्कर व्यवहार विभाग खालील बाबींवर कार्य करणार -

- देशाची सशस्त्र दले - भुदल, नौदल आणि हवाई दल

-भुदल मुख्यालय, नौदल मुख्यालय, हवाई दल मुख्यालय आणि संरक्षण कर्मचारी मुख्यालय असलेले संरक्षण मंत्रालयाचे एकात्मिक मुख्यालय

▪️प्रादेशिक सैन्य

- भुदल, नौदल आणि हवाई दलाशी संबंधित कामे

- प्रचलित नियम आणि कार्यपद्धतीनुसार भांडवल संपादन वगळता सेवांसाठीची मिळकत

- एकत्रित संयुक्त योजना आणि आवश्यकतांच्या माध्यमातून खरेदी, प्रशिक्षण आणि कर्मचार्‍यांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेचे समन्वय

-सैन्य तुकड्यांचे पुनर्गठन करणे आणि संयुक्त कारवाईद्वारे स्रोतांच्या तर्कशुद्ध वापरासाठी संयुक्त आदेश तयार करणे.

- सेवेद्वारे स्वदेशी उपकरणांच्या वापरास चालना देणे.

-लष्कर व्यवहार विभागाचे प्रमुख असण्याव्यतिरिक्त संरक्षण प्रमुख ‘चीफ ऑफ स्टाफ कमिटी’चे स्थायी अध्यक्षही असणार.

- चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे स्थायी अध्यक्ष म्हणून, CDSला खालील कार्ये पार पाडावी लागणार.

- CDS त्रिकोणीय सेवा संस्था देणार. सायबर आणि अंतराळाशी संबंधित त्रिकोणीय सेवा संस्था/तुकडी CDSच्या अखत्यारीत असणार.

- संरक्षण मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या (NSA) अध्यक्षतेखाली संरक्षण योजना समितीच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण समितीचे CDS सदस्य असणार.

- न्युक्लीयर कमांड अथॉरिटीचे लष्करी सल्लागार म्हणून काम पाहणार.

- CDS पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तीन वर्षांच्या आत तीन सेवांमध्ये कार्यवाही, मालवाहतूक, प्रशिक्षण, पाठबळ सेवा, दळणवळण, दुरुस्ती आणि देखभाल इ. कार्यांमध्ये संयुक्तता आणणार.

- पायाभूत सुविधांचा जास्तीतजास्त वापर करून सेवांमध्ये तर्कसंगतपणा आणणार.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...