🎆 युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या करारावर स्वाक्षरी करत ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या इतिहासातल्या नव्या अध्यायाला आज सुरुवात केली. यानंतर युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ब्रिटनचा मार्ग मोकळा झाला आहे.
🎆 डाउनिंग स्ट्रिट इथं युरोपीय महासंघ आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसमोर जॉन्सन यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
🎆 ब्रिटनच्या नागरिकांच्या जनमताचा आदर ठेवून, येत्या ३१ जानेवारीपासून युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या करारावर आपण स्वाक्षरी केली असल्याचं, जॉन्सन यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment