Sunday, 19 January 2020

भारताची राज्यघटना प्रश्नसंच

प्र.1. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली? (राज्यसेवा मुख्य २०१५)

१) उद्देशपत्रिका २) मूलभूत अधिकार

३) मूलभूत कर्तव्ये ४) मार्गदर्शक तत्वे

प्र.2. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही ……..आहे. (राज्यसेवा मुख्य २०१२)

अ) राज्यघटनेचे हृदय ब) राज्यघटनेचा आत्मा

क) राज्यघटनेचे डोके ड) यापैकी नाही

योग्य पर्याय निवडा: –

१) अ व क २) ब व क

३) फक्त ब ४)फक्त ड

प्र.3. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली? (राज्यसेवा मुख्य २०१२)

१) १९५२ २) १९६६

३) १९७६ ४) १९८६

 प्र.4. खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले? (राज्यसेवा मुख्य २०१३)

4) बेरुबरी खटला

२) गोलकनाथ खटला

३) केसवानंद भारती खटला

४) बोम्मई विरुध्द भारताचे संघराज्य

प्र.5. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील ‘सार्वभौम’ या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो? (राज्यसेवा मुख्य २०१३)

अ) बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वत:शी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करु शकतो.

ब) संघ आणि घटक राज्ये दोन्ही सार्वभौम आहेत.

क) भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करु शकतो.

ड) भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत.

पर्याय उत्तरे :

१) ब,क,ड २) अ,ब,क

३)अ,क,ड ४)अ,ब,ड

प्र.6. खालील मुद्यांचा विचार करा.(राज्यसेवा मुख्य २०१४)

अ) भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरुंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते.

ब) हा ठराव संविधान सभेने २२ जानेवारी १९४८ रोजी स्वीकृत केला.

१) दोन्ही बरोबर आहेत २) दोन्ही चूक आहेत

३) ब बरोबर आहे ४) अ बरोबर आहे

 प्र.7.भारतीय राज्यघटनेचे ‘आर्थिक न्याय’ हे उद्दिष्ट ……यातून व्यक्त होते. (राज्यसेवा मुख्य २०१५)

१) प्रस्तावना आणि मूलभूत अधिकार

२) प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे

३) मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे

४) वरीलपैकी एकही नाही

प्र.8. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेची वर्णने व ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली यांची जुळणी करा: (राज्यसेवा मुख्य २०१५)

अ) ‘घटना कर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली’ i) पंडीत ठाकुरदास भार्गव

ब) ‘राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग’ ii) के.एम.मुन्शी

क) ‘राजकीय कुंडली’ iii) भारताचे सर न्यायाधीश ‘सिक्री’

ड) ‘अत्यंत महत्वपूर्ण भाग’ iv) बेरुबारी संदर्भ खटला (१९६०)

अ   ब क   ड

१) iv i ii iii

२) i ii iii iv

३) iii iv i ii

४) ii iii iv i

प्र.9, फाझल अली कमिशनचे सदस्य…………. होते. (राज्यसेवा मुख्य २०१६)

अ) के.एम. पण्णीकर ब) हृदयनाथ कुझरू

क) यशवंतराव चव्हाण ड) अण्णा डांगे

पर्याय

१) फक्त अ,ब २) फक्त क, ड

३) फक्त ब, क ४) वरीलपैकी सर्व

प्र.10. उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू (राज्यसेवा मुख्य २०१६)

१) पं. जवाहरलाल नेहरू यांनी घटनासमितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला.

२) दिनांक १३ डिसेंबर १९४६ रोजी उद्दिष्टांचा ठराव घटनासमिती समोर ठेवण्यात आला.

३) उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता.

४) या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले.

Ans :

१) १, २) ३, ३) ३, ४) १, ५) ३, ६) ४, ७) २, ८) १, ९) १, १०) ४

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...